एक्स्प्लोर

Share Market Updates :शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे'; गुंतवणूकदारांच्या सहा लाख कोटींचा चुराडा

Share Market Crash : शेअर बाजारात आज झालेल्या पडझडीत गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे जवळपास 6 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

Share Market: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. विक्रीच्या सपाट्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 1500 अंक आणि निफ्टीमध्ये 400 हून अधिक अंकांची घसरण झाली आहे. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. शेअर बाजारात आलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या सहा लाख कोटींचा चुराडा झाला आहे. 

मागील आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली होती. शुक्रवारी बाजार बंद होताना शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalization ) 251.84 लाख कोटी रुपये होते. आज सकाळी झालेल्या घसरणीनंतर बाजार भांडवल 246.12 लाख कोटी रुपये झाले आहे. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे. यामध्ये 3403 स्टॉक्सपैकी 2624 स्टॉकमध्ये विक्रीचा सपाटा सुरू आहे. फक्त 655 स्टॉक्समध्ये खरेदी सुरू आहे. तर, 241 स्टॉक्सच्या शेअर दरात लोअर सर्किट लागले आहे. 

बाजारात घसरण का?

अमेरिकेत महागाईने उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत महागाईने मागील 40 वर्षातील उच्चांक गाठला आहे. वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ होण्याची शक्यता आहे.  फेडरल रिझर्व्हकडून  14 आणि 15 जून दरम्यान बैठक होणार आहे. या बैठकीत व्याज दरवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी गुंतवणूकदार शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढत असून सुरक्षित ठिकाणी गुंतवण्यासाठी शेअर विक्री करत आहेत.

डॉलरच्या तुलनेत रुपया गडगडला

डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली ऐतिहासिक घसरण कायम सुरू आहे. रुपयाने पहिल्यांदाच एका डॉलरच्या तुलनेत 78 रुपयाचा स्तर गाठला. आज रुपयात 43 पैशांची घसरण झाली. त्यामुळे आता एका डॉलरसाठी 78.28 रुपये मोजावे लागणार आहेत. परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री आणि अमेरिकेतील महागाई दर यामुळे एका डॉलरच्या तुलनेत रुपयांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget