एक्स्प्लोर

Share Market Crash : शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण

Share Market Crash : शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्स निर्देशांक प्री-ओपनिंगमध्ये 1000 अंकांनी कोसळला.

Share Market Crash : भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली आहे. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचे पडसाद भारतीय शेअर बाजारावरही दिसून आले. आज प्री ओपनिंगमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 1100 अंकांनी कोसळला. तर, निफ्टीत 324 अंकांची घसरण दिसून आली.  

भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. प्री-ओपनिंगमध्ये दिसून आलेल्या घसरणीनंतर शेअर बाजारावर विक्रीचा मोठा दबाव असल्याचे संकेत आहेत. सकाळी 9.18 वाजता शेअर बाजारात व्यवहार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये 1331 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. त्यावेळी सेन्सेक्स 52940 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. त्याशिवाय, निफ्टीमध्ये 385 अंकांची घसरण नोंदवण्यात आली.  निफ्टी 15813 अंकाच्या आसपास व्यवहार करत होता. 

वाढत्या महागाईचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेत विक्रमी महागाई नोंदवण्यात आल्यानंतर शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात पडझड झाली होती. त्याशिवाय, आज SGX NIFTY मध्ये व्यवहाराची सुरुवात गॅप डाऊनने झाली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. 

सेन्सेक्समधील टॉप 30 स्टॉक्सपैकी फक्त दोन शेअर्समध्ये खरेदी सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर, उर्वरित 28 स्टॉकच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. टाटा मोटर्स, एचडीएफसी, विप्रो, हिंदाल्कोसारख्या कंपन्यांचे शेअ४स तीन टक्क्यांहून अधिक दराने घसरले आहेत. 

रुपयाची विक्रमी घसरण

डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 78.20 रुपये इतके झाले आहे. पहिल्यांदाच रुपयांने इतका नीचांकी दर गाठला आहे. 

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा

परदेशी गुंतवणुकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातही घसरण होत आहे. जागतिक पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदारांकडून (FPI) विक्रीचा सपाटा सुरू आहे. FPIsने या महिन्यात आतापर्यंत भारतीय बाजारातून 14,000 कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी डेटानुसार, FPIs ने यावर्षी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 1.81 लाख कोटी रुपये काढले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
लातूर जिल्हा बँक निवडणूक! मंत्री बाबासाहेब पाटील आणि धीरज देशमुख एकाच गाडीत, राजकीय चर्चांना उधाण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Embed widget