एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्सने घेतली 400 अंकाची उसळण

Share Market Updates : आज शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला.

Share Market Updates : आज सकाळी शेअर बाजाराची चांगली सुरुवात झाली. आशियाई बाजारात असलेले सकारात्मक वातावरण आणि मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात असलेली तेजी याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचाही परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. 

सेन्सेक्स 419.2  अंकांच्या उसळणीसह 58362 अंकांवर सुरू झाला. तर, निफ्टी निर्देशांक 142.85 अंकांनी वधारून 17468.15  अंकावर खुला झाला. ऑटो, रिअल इस्टेट, मीडिया या क्षेत्रातील शेअर वधारले आहेत. 

निफ्टी 50 मधील 45 शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तर, पाच शेअरमध्ये घसरण दिसत आहे. बँक निफ्टी 261 अंकांनी वधारला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 650 अंकांनी  तर निफ्टी 170 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्स 58, 580 अंकावर, तर निफ्टी 17496 अंकावर ट्रे़ड करत होता. 

कोणत्या क्षेत्रात तेजी 

मेटल आणि ऑइल-गॅस हे क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रात तेजी दिसून आली आहे. रिअलटी इस्टेटमध्ये 1.47 टक्के, मीडिया सेक्टरमध्ये 1.27, ऑटो क्षेत्र 1.14 टक्क्यांनी वधारले आहेत. त्याशिवाय बँक, एफएमसीजी, आयटी, फार्मा आणि वित्तीय सेवांचे शेअर्स वधारले आहेत.

Share Market : शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्सने घेतली 400 अंकाची उसळण

प्री-ओपनिंगमध्ये बाजार 

प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्स 419.20 अंकांनी वधारत 58,362 अंकावर व्यवहार करत होता. निफ्टीदेखील 142.85 अंकांवर व्यवहार करत होता. 

मंगळवारीदेखील तेजी 

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी कायम राहिली. मंगळवारी शेअर बाजार सुरू झाला तेव्हा बाजारात खरेदी होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर व्यवहाराच्या शेवटच्या सत्रात तेजी कायम राहिली. मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार संपले तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले होते. मंगळवारी, सेन्सेक्स 350.16 अंकांवर म्हणजे 0.61 टक्क्यांच्या तेजीसह 57,943.65 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी निर्देशांकात 103.30 अंकांनी वधारत 17,325.30 अंकांवर बंद झाला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget