एक्स्प्लोर

Share Market Updates : शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला

Share Market Updates : शेअर बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स 600 अंकानी कोसळला. तर, निफ्टीतही घसरण दिसून आली आहे.

Share Market Updates : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.  भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर 600  अंकानी सेन्सेक्स घसरला. अमेरिकन शेअर बाजारातही घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. 

शेअर बाजार सुरू झाला तेव्हा एक टक्क्यांहून अधिक घसरण सेन्सेक्समध्ये झाली. निफ्टीमध्ये 178 अंकाची घसरण दिसून आली. निफ्टी निर्देशांक 16,924.45 अंकावर सुरू झाला. तर, सेन्सेक्स 56,429.45 अंकावर सुरू झाला. आज निफ्टीमधील 50 पैकी 4 शेअर्स वधारले आहेत. तर, 46 शेअरमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टीमध्ये 115 अंकानी घसरत 35973 अंकावर व्यवहार करत होता. बँक निफ्टी निर्देशांक 36000 अंकाखाली घसरला आहे. प्री-ओपनिंग सत्रात  घसरलेला सेन्सेक्स सकाळी 9.30 वाजल्यानंतर काही प्रमाणात सावरला असल्याचे चित्र होते. मात्र, बाजारात विक्रीचा दबाब असल्याचे स्पष्ट चित्र आहे. 

याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 460 अंकांनी घसरून 57,061 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 143 अंकांच्या घसरणीसह 17,102 अंकांवर बंद झाला. 

आज शेअर बाजारात इंडसइंड बँकेच्या शेअर दरात 4.71 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, अॅक्सिक बँकेच्या शेअर दरात 1.02 टक्क्यांनी वाढ झाली. टाटा मोटर्समध्ये 0.59 टक्के आणि डिव्हीज लॅबच्या शेअरमध्ये 0.14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

टायटनच्या शेअर दरात 1.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. बजाज ऑटोच्या शेअर दरात 1.65 टक्के, एशियन पेंट्समध्ये 1.58 टक्क्यांची घसरण दिसून आली. सन फार्मामध्येदेखील 1.56 टक्क्यांची घट झाली आहे. 

शेअर बाजारावर कोरोनाचे सावट?

चीनसह जगभरात कोरोना महासाथीची लाट येत असल्याचे चित्र आहे. भारतातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. भारतासह जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती आहे. अमेरिकन शेअर बाजारात मोठी पडझड झाली. डाउ जोन्स शुक्रवारी जवळपास 900 अंकानी घसरला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
E20 Petrol : पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 31.2 टक्के आढळलं, कर्नाटक सरकारच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर
पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 31.2 टक्के आढळलं, कर्नाटक सरकारच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर  
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
Agristack : महायुती सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी... 
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Maharashtra Live blog updates: वैभव चव्हाण आत्महत्या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
Tukaram Mundhe: मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंचं मुलांसोबतचं नातं कसं, काय-काय म्हणाले?
मित्रांच्या बर्थ डे पार्टीला ड्रिंक असेल तर माझा मुलगा स्पष्टच नकार देतो, तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, काय-काय म्हणाले?
Embed widget