एक्स्प्लोर

Share Market Updates : शेअर बाजाराची नकारात्मक सुरुवात, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण

Share Market : शेअर मार्केटमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात नकारात्मक झाली.

Share Market : आज गुरुवारी, शेअर बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. ओपनिंग ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला. जागतिक शेअर बाजारातही नकारात्मक वातावरण असल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. बुधवारी अमेरिकन बाजारातील तीन प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली होती. त्याचे प्रतिबिंब भारतीय शेअर बाजारावर दिसून आले. 

आज सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली. सेनसेक्स 494.77 अंकांनी घसरला. तर, निफ्टी 150.70 अंकांनी घसरून 17,094 अंकांवर सुरू झाला. युक्रेन-रशिया युद्ध थांबत नसल्यानं देखील जागतिक स्तरावरील एक्सचेंजमध्ये पडझडीचे सत्र सुरुच आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारात दिसून येत आहे. 

सकाळी 9.30 वाजता बाजाराची काय स्थिती?

सकाळी 9.30 वाजता सेन्सेक्स सावरताना दिसून येत असून  187.62 अंकांच्या म्हणजे 0.33 टक्क्यांच्या घसरणीसह 57,497 वर व्यवहार करत आहे. NSE चा निफ्टी 17200 च्या जवळ व्यवहार करत आहे.

बँका, रिअल इस्टेट, ग्राहकोपयोगी वस्तू, वित्तीय सेवा आणि खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निर्देशांकात  घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मीडिया सेक्टर 5 टक्क्यांनी वधारला आहे. कोल इंडिया, हिंदाल्को, आयटीसी आणि ओएनजीसीच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, कोटक बँकमध्ये 3.27 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टायटनमध्ये घसरण झाली आहे. 
 

बुधवारी कसा होता शेअर बाजार? 

सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर बुधवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा घसरण झाल्याचं दिसून आलं. बुधवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 304 अंकांनी तर निफ्टीही 69 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये 0.53 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,684 अंकावर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,245 अंकावर पोहोचला. 


बुधवारी 1424 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 1891 शेअर्समध्ये घसरण झाल्याची नोंद करण्यात आली. 118 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget