Share Market News: बुलेट ट्रेनच्या वेगाने सुस्साट पळताहेत रेल्वेच्या 'या' चार कंपन्यांचे शेअर्स
Share Market News: भारतीय रेल्वेशी निगडीत असलेल्या चार कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.
Share Market News: भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून चांगली तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने उच्चांक गाठला आहे. बाजारात दिसून येत असल्याच्या तेजीच्या परिणामी काही शेअर्समध्येही तेजी दिसून आली आहे. मागील काही आठवड्यांमध्ये भारतीय रेल्वेशी निगडीत असलेल्या (Indian Railway related Stocks) काही शेअर्सने चांगलाच वेग पकडला आहे. यातील एका कंपनीच्या शेअरच्या दरात महिनाभरात 88 टक्क्यांची तेजी दिसून आली.
रेल विकास निगम लिमिटेड (Rail Vikas Nigam Ltd), इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (Ircon International Ltd), इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Railway Finance Corporation) आणि टेक्समॅको रेल अॅण्ड इंजिनिअरिंग (Texmaco Rail And Engineering) या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.
रेल विकास निगम लिमिटेड
रेल विकास निगम लिमिटेडच्या (RVNL) शेअर दरात एका महिन्यात 88 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसईवर दोन नोव्हेंबर रोजी या शेअरचा दर 39.95 रुपये इतका होता. तर, शुक्रवारी बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा 74.95 रुपयांवर शेअर दर स्थिरावला. मागील सहा महिन्यात रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर दर 116 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. या स्टॉकने 84.10 रुपयांचा 52 आठवड्यातील उच्चांक गाठला आहे.
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअर्समध्येही गेल्या एका महिन्यात मोठी वाढ झाली. गेल्या एका महिन्यात शेअरचा दर 40 टक्क्यांहून अधिक वधारला. या शेअरचा दर 2 नोव्हेंबर 2022 रोजी 49.95 रुपये होता. शुक्रवारी शेअर रु.64.25 वर व्यवहार करत होता. बाजार बंद झाला तेव्हा शेअर दर 63.00 रुपयांवर स्थिरावला. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 59 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 64.65 रुपये आणि नीचांकी दर 34.80 रुपये आहे.
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनचा शेअर दर मागील एका महिन्यात 50 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. दोन नोव्हेंबर 2022 रोजी या शेअरचा दर 22.65 रुपये होता. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा शेअर दर 34.40 रुपयांवर स्थिरावला. मागील सहा महिन्यात या शेअर दरात 60 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर दरात 47.74 टक्क्यांची तेजी दिसून आली. या शेअर दराचा 52 आठवड्यांतील उच्चांक 37.10 रुपये आहे.
टेक्समॅको रेल अॅण्ड इंजिनिअरिंग
टेक्समॅको रेल अॅण्ड इंजिनिअरिंग कंपनीचा शेअर दर मागील एका महिन्यात 20.36 टक्क्यांनी वधारल आहे. दोन नोव्हेंबर रोजी हा शेअर 49.85 रुपयांवर व्यवहार करत होता. शुक्रवारी या कंपनीचा शेअर दर 60.25 रुपयांवर स्थिरावला. या शेअर दराने 52 आठवड्यातील उच्चांक 65.258 रुपये गाठला.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून शेअर खरेदी-विक्रीचा सल्ला नाही.)