Share Market Update : शेअर बाजारात सुरुवातीपासून मोठी उसळण पाहायला मिळत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर लक्ष केंद्रित केले जात असतानाही, सलग तिसऱ्या सत्रासाठी इक्विटी बेंचमार्कमध्ये वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत गुरुवारी सुरुवातीला 5.4 लाख कोटींची वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारातील बुधवारच्या तेजीमुळे कंपन्यांचे बाजार भांडवल अवघ्या दोन दिवसांत 7,21,949  कोटी रुपयांनी 2,48,32,780.78 कोटींवर पोहोचले आहे. यामध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये मंगळवारी लाख कोटी 2.51 पेक्षा जास्त वाढ झाली.


गुरुवारी सेन्सेक्स निर्देशांक 1,300 अंकांपेक्षा अधिक वधारला, तर निफ्टी 16,700 च्या वर पोहोचला. 28 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत बाजाराला चार सत्रांमध्ये तीव्र घसरणीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता गेले काही दिवस शेअर बाजारात उसळी पाहायला मिळतेय. गुरुवारी सत्राच्या सुरुवातीला अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, बजाज फायनान्स सेन्सेक्समध्ये आघाडीवर पाहायला मिळाले. निफ्टी मेटल वगळता, सर्व निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक क्षेत्रामध्ये व्यवहार करत होते.  


कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण
कच्च्या तेलाचे भाव 111 डॉलर्सवर आल्याने जागतिक बाजारात उत्साह कायम आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 130 डॉलरवरून आता प्रति बॅरल 111 डॉलरपर्यंत घसरली आहे. कच्च्या तेलाची किंमत 13 टक्क्यांनी कमी होऊन प्रति बॅरल 111 डॉलर झाली आहे. खरे तर तेल उत्पादक देशांच्या संघटनेचा (ओपेक) सदस्य असलेला संयुक्त अरब अमिराती (यूएई) कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवणार आहे. तसे झाल्यास पुरवठ्यातील कमतरता भरून काढण्यास मदत होईल. कारण रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे, तर अमेरिकेने रशियाकडून तेल आयातीवर बंदी घातली आहे, त्यामुळे कच्चे तेलाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha