UP Election Result 2022 LIVE : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट केलं आहे. अखिलेश यादव यांचं हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. ईव्हीएमवर लक्ष ठेवल्याबद्दल त्यांनी सपा कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. मतमोजणी केंद्रांवर लक्ष ठेवण्याचे आदेश अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. तसेच, सपा नेत्यांसाठी आठ ते आठ तासांच्या तीन शिफ्ट लावण्यात आल्या होत्या.
अखिलेश यादव यांनी ट्वीट केले की, '''इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक़्त आ गया है अब 'फ़ैसलों' का' मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुक आणि सतर्कतेनं कार्यरत राहिल्याबद्दल सपा-आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे, समर्थकांचे, नेते, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! 'लोकशाहीचे पाईक' विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परततील!"
उत्तरप्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 200 च्या वर जागांवर आघाडीवर आहे तर समाजवादी पार्टी 80 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. उत्तर प्रदेशात भाजप आणि समाजवादी पक्षात थेट लढत पाहायला मिळत आहे.
दरम्यान, देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
- Punjab Election Result 2022 Live : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकाल एका क्लिकवर...
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
- Goa Election Result 2022 Live : भाजप सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेत येणार? अचूक निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा...
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा