एक्स्प्लोर

Stock Market : सलग पाच दिवस 'या' स्टॉकला अप्पर सर्किट, बाजार सुरु होताच धमाका, ड्रोन बनवणाऱ्या कंपनीची दमदार कामगिरी 

Zen Tech Share Upper Circuit : संरक्षण क्षेत्रातील कंपनी झेन टेक्नोलॉजी या ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या स्टॉकनं शेअर मार्केटमध्ये धमाका केला आहे.  

मुंबई : संरक्षण क्षेत्रातील कंपनी Zen Tech कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये या कंपनीच्या स्टॉकला सहज 5 दिवस अप्पर सर्किट लागत आहे. आज देखील झेन टेक्नोलॉजीच्या शेअरला अप्पर सर्किट लागलं. गेल्या शनिवारी कंपनीनं त्यांच्या 2024-25 मधील चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. यानंतर शेअर बाजारात या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 

भारतीय शेअर बाजारात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. मात्र, झेन टेक्नोलॉजीच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाल्यानं अप्पर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर 1884.50 रुपयांवर पोहोचला आहे. तर, कंपनीचं बाजारमूल्य 16940 कोटींवर पोहोचलं आहे.

झेन टेक्नोलॉजीचा चौथ्या तिमाहीतील निव्वळ नफा 189 टक्क्यांनी वाढून 101 कोटी रुपये झाला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 34.94 कोटी रुपये होता. कंपनीचा महसूल मार्च तिमाहीत 129.8 टक्क्यांनी वाढून 324.97 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो गेल्या वर्षी 141.39 कोटी रुपये झाला होता. 

झेन टेक्नोलॉजीच्या शेअर गेल्या पाच दिवसात 400 रुपयांनी वाढला आहे. यामुळं गुंतवणूकदारांनी जोरदार कमाई केली आहे. झेन टेक त्याच्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे. या पाच वर्षात झेन टेकच्या गुंतवणूकदारांना 5063 टक्के परतावा मिळाला आहे. या कंपनीच्या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2627 रुपये तर नीचांक 893.95 रुपये आहे. 

झेन टेक्नोलॉजी कंपनीची स्थापना 9 मार्च 2018 ला डेलावेअर, यूएसए कायद्यानुसार झाली होती. ही कंपनी सैन्य आणि सुरक्षा दलांसाठी लढाऊ प्रशिक्षण सिमुलेटर आणि यंत्रणा विकसित करण्यावर काम करते. लाइव्ह फायर, आभासी आणि क्रिएटिव्ह सोल्यूशन्समध्ये कंपनी काम करते. काऊंटर ड्रोन तंत्रज्ञानावर जोर देण्यात आला आहे.

इतर बातम्या : 

 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
Multibagger Stock :मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, इंटिग्रेटेड प्रोटीन्सकडून 1:10 स्टॉक स्प्लिटची घोषणा
मल्टीबॅगर स्मॉल-कॅप स्टॉककडून एका वर्षात 241 टक्के परतावा, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget