एक्स्प्लोर

Share Market : इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका, शेअर बाजारात भूकंप, गुंतवणूकदारांचे 1.65 लाख कोटी बुडाले, HDFC बँकेला सर्वाधिक फटका

Share Market Update : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धाचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. पाच दिवसात एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांना फटका बसला आहे. 

मुंबई : गेल्या आठवड्यातील 9 ते 13 जून हे दिवस गुंतवणूकदारांसाठी खराब ठरले. इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळं पाच दिवसात गुंतवणूकदारांचे 1.65 लाख कोटी बुडाले. सेन्सेक्समध्ये 1070.39 अंकांची म्हणजेच 1.30 टक्के घसरण झाली. सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं. एचडीएफसी बँकेला सर्वात मोठा फटका बसला.

सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance), एचडीएफसी बँक (HDFC Bank), भारती एअरटेल (Bharti Airtel), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), भारतीय स्टेट बँक (SBI), भारतीय जीवन बीमा निगम (LIC), बजाज फायनान्स (Bajaj Finance) आणि हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेड (HUL) चं बाजारमूल्य घटलं.  तर, टीसीएस आणि इन्फोसिसचं बाजारमूल्य वाढलं.  

 9 जून ते 13 जून या कालावधीत सर्वाधिक नुकसान एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांचं झालं. एचडीएफसीचं बाजारमूल्य 5 दिवसात 47075.97 कोटी रुपयांनी घटलं. सध्या कंपनीचं बाजारमूल्य 1468777.88 कोटी इतकं आहे. यानंतर आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य 30677.44 कोटी रुपयांनी घटून 1010375.63 कोटी रुपयांवर आलं. रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 21516.63 कोटी रुपयांनी घटून 1931963.46 कोटी रुपयांवर आलं. स्टेट बँकेचं बाजारमूल्य 18250.85 कोटी रुपयांनी घटून 707186.89 कोटी रुपयांवर आलं.  

हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेडचं बाजारमूल्य 16388.4 कोटी रुपयांनी घटून 544893.71 कोटी रुपयांवर आलं. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 15481.22 कोटी रुपयांनी घटून 1050413.33 कोटी रुपयांवर आलं.  एलआयसीचं बाजारमूल्य 13693.62 कोटी रुपयांनी घसरुन 593379.66 कोटी रुपयांवर आलं. बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 2417.36 कोटी रुपयांनी घसरुन 580052.09 कोटी रुपयांवर आलं.  

टीसीएस आणि इन्फोसिसचे गुंतवणूकदार मालामाल

एकीकडे  सेन्सेक्सवरील टॉप  10 पैकी 8 कंपन्यांना नुकसान सहन करावं लागलं असलं तरी इन्फोसिस आणि टीसीएसच्या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. टीसीएसचं बाजारमूल्य 22215.06 कोटी रुपयांनी वाढून 1247190.95 कोटी रुपयांवर आलं. तर, इन्फोसिसचं बाजारमूल्य 15578.3 कोटी रुपयांनी वाढून 665318.03 कोटी रुपयांवर आलं.  

रिलायन्स पहिल्या स्थानी कायम

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठं नुकसान सहन करावं लागलं असलं तरी ते बाजारमूल्याच्या निकषावर पहिल्या स्थानावर आहेत. त्यानंतर एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस, एलआयसी, बजाज फायनान्स आणि हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेड असा क्रम आहे.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदार तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi Protest United Nations: दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
दिल्लीत आंदोलकांची धरपकड, संयुक्त राष्ट्रसंघाने चिंता व्यक्त करताच भारताचं तात्काळ प्रत्युत्तर, म्हणाले...
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Embed widget