एक्स्प्लोर

Share Market Closing Bell: शेअर बाजार सुस्साट...सलग सहाव्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टीची ऐतिहासिक उसळण

Share Market Closing Bell: शेअर बाजारात आजही खरेदीचा जोर दिसून आला, सलग सहाव्या सत्रात सेन्सेक्स, निफ्टीने नवी उच्चांकी पातळी गाठली.

Share Market Closing Bell:  सलग सहाव्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. आज सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) पुन्हा एकदा ऐतिहासिक उच्चांक गाठला. बाजारात आज दिवसभर तेजी दिसून आली तरी नफावसुलीमुळे काही प्रमाणात ब्रेक लागला. बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 184  अंकांच्या तेजीसह 63,284  अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 54 अंकांच्या तेजीसह 18,812 अंकांवर स्थिरावला.

बाजारातील व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 13 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 निर्देशांकातील 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 27 कंपन्यांचे शेअर दर घसरले. बँक निफ्टीनेदेखील उच्चांक गाठल्यानंतर नफावसुली दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांकाने आज 43,515.05 अंकांचा उच्चांक गाठला. बाजार बंद झाला तेव्हा बँक निफ्टी निर्देशांक 29.65  अंकांच्या तेजीसह 43,260.65 अंकांवर स्थिरावला. 

आज दिवसभरातील व्यवहारात आयटी, मेटल, रियल्टीच्या शेअर दरात खरेदीचा जोर दिसून आला. तर, एनर्जी, एफएमसीजी, ऑटो शेअरच्या दरात घसरण दिसून आली. ऑटो क्षेत्रातील खरेदी-विक्रीचे संमिश्र आकडे समोर आल्याने ऑटो कंपन्यांच्या शेअर दरावर विक्रीचा दबाव दिसून आला. 

डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी मजबूत झाला असून 81.22 रुपयांच्या स्तरावर बंद झाला. 

निफ्टी निर्देशांकात अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात 2.84 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, हिंदाल्कोच्या शेअर दरात 2.80 टक्के, टाटा स्टीलच्या शेअर दरात 2.69 टक्के, टीसीएसच्या शेअर दरात 2.43 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

तर, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात 1.41 टक्के, यूपीएलच्या शेअर दरात 1.41 टक्के, सिप्लाच्या शेअर दरात 1.37 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्याशिवाय, आयशर मोटर्सच्या शेअर दरात 1.31 टक्के, बजाज ऑटोच्या शेअर दरात 1.22 टक्क्यांची घसरण दिसून आली. 

दरम्यान, गुरुवारी बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर तेजी कायम राहिली. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांकाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 367 अंकांच्या तेजीसह 63,467 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 113 अंकांनी वधारत 18,871  अंकांवर खुला झाला.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?
सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; तर सोन्याचा भावही पुन्हा कोसळला; नेमकी स्थिती काय?
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
Narendra Modi : 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Gondia Crime News: पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
पुण्यातील एअर हॉस्टेसच्या हत्येचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, वर्षा तुरकरच्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण?
Babasaheb Ambedkar Indu Mill memorial: इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा वेग मंदावला, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे सहा महिन्यांपासून पुतळ्याचे काम बंद
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Embed widget