एक्स्प्लोर

Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात चांगली सुरुवात; सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये किंचित तेजी, बँक आणि आयटी शेअर्सची घोडदौड

Share Market Opening : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात किंचित वाढ झाली आहे.

Share Market Opening Bell : शेअर बाजारात (Share Market) आज (20 जानेवारी) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंचित वाढ झाली आहे. शेअर बाजार किरकोळ (Share Market Opening Bell) तेजींसह उघडला. सुरुवातीच्या सत्रात बँक शेअर्सची घोडदौड पाहायला मिळत आहे. जागतिक बाजाराचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजारातही (Indian Share Market) किंचित तेजी दिसत आहे. आशियाई बाजारात तेजी आहे, तर अमेरिकन बाजारत घसरण पाहायला मिळत आहे. आज BSE सेन्सेक्स (Sensex) 45 अंकांच्या तेजीसह 60,903 वर उघडला तर, निफ्टी (Nifty 50) 8 अंकांनी वाढून 18,115 वर उघडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, किंचित तेजीसह उघडल्यानंतर मात्र बाजारात चढउतार पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात तेजी आणि घसरण असं संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे.

बँक, आयटी शेअर्सची घोडदौड

आज शेअर बाजारात किरकोळ किंचित तेजीसह उघडला आहे. शेअर बाजारात बँकिंग सेक्टरला अच्छे दिन असल्याचं दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज बाजारात बँक, आयटी मेटल, एनर्जी सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. तर कन्झ्युमर ड्यूरेबल्स, हेल्थकेयर, एफएमसीजी, ऑटो आणि फार्मा सेक्टरमध्ये घसरण झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅपची घोडदौड सुरु आहे.

शेअर बाजारात संमिश्र वातावरण

सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 18 शेअर्स तेजीत तर 12 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. तसेच निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 22 शेअर्स तेजीसह उघडले, पण इतर 28 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. एफएमसीजी सेक्टरच्या शेअर्समध्येही मोठी घसरणी झाली आहे. यामुळे बाजारात दबाव वाढताना दिसत आहे.

शुक्रवारी सकाळी सुरुवातीच्या सत्रात हिंदुस्थान झिंकचे शेअर्स आठ टक्क्यांनी घसरले. तर दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर्सही तीन टक्क्यांनी घसरले आहेत. आज रिलायन्स, युनियन बँक आणि बंधन बँक या शेअर्समध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे.

'या' शेअर्समध्ये तेजी

आज सुरुवातीच्या सत्रामध्ये पॉवरग्रीड, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, कोटक बँक, टीसीएस, एल अँड टी तसेत एचसीएल हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.

'या' शेअर्समध्ये घसरण

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स विप्रो, भारती एअरटेल, मारुती, आयटीसी, रिलायन्स, टायटन, एशियन पेन्टस, सन फार्मा हे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Metro : 3 वर्ष नोकरीच्या शोधात, आता मिळाली नशिबाची साथ; 'या' तरुणीने चालवली पंतप्रधानांनी प्रवास केलेली मेट्रो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Temperature: देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहराच नाव;  शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहराच नाव; शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नवी दिल्लीत 25 आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला, भाजपचा 100 टक्के स्ट्राईक रेट, 6 आमदार पुन्हा विधानसभेत
आम आदमी पार्टीनं 36 आमदारांना विधानसभेला उतरवलं, 22 जणांना मतदारांनी नाकारलं, नवी दिल्लीत काय काय घडलं?
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 10 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 10 Feb 2025 | Maharashtra NewsCM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : मुख्यमंत्री फडणवीस 'शिवतीर्थ'वर राज ठाकरे यांच्या भेटीलाABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 10 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सUday Samant On Rajan Salvi : सामंत बंधूंचा साळवींच्या पक्ष प्रवेशाला विरोध नाही : उदय सामंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Temperature: देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहराच नाव;  शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहराच नाव; शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नवी दिल्लीत 25 आमदारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला, भाजपचा 100 टक्के स्ट्राईक रेट, 6 आमदार पुन्हा विधानसभेत
आम आदमी पार्टीनं 36 आमदारांना विधानसभेला उतरवलं, 22 जणांना मतदारांनी नाकारलं, नवी दिल्लीत काय काय घडलं?
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
शोएब अख्तर अंगावर धावून आला, हरभजन सिंगनेही उचलली बॅट अन्...; मैदानात काय घडलं?, VIDEO आला समोर
Solapur Accident: सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू,15 जखमी
सोलापूरच्या मोहोळमध्ये भीषण अपघात, कंटेनरची मिनी बसला धडक, तिघांचा मृत्यू,15 जखमी
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी बातमी: एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधून वगळले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
मुंबई-पुणे Expresswayवर मोठा बदल! पनवेल एक्झिट उद्यापासून 6 महिन्यांसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ ट्रेडनं विदेशी गुंतवणूकदार घाबरले, भारतीय शेअर बाजारातून काढता पाय, 6 दिवसात 7342 कोटी काढून घेतले
अमेरिकेच्या टॅरिफ ट्रेडचा धसका, विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय, भारतीय शेअर बाजारातून 7342 कोटी काढून घेतले
Embed widget