Share Market : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स, निफ्टी वधारले
Stock Market : शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली.
Share Market Updates : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीदेखील शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 430 अंकांनी वधारला. सेन्सेक्स निर्देशांकाने 59 हजार अंकाचा टप्पा ओलांडला. त्याशिवाय, निफ्टीदेखील 130 अंकांनी वधारला. निफ्टी 17706 वर सुरू झाला.
शेअर बाजारात आयटी आणि कंझ्युमर ड्युरेबल्समधील स्टॉक वगळता इतर क्षेत्रांमध्ये चांगली खरेदी सुरू आहे. स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सदेखील वधारले आहेत. बँकिंग, ऑटो, फार्मा, एफएमसीजी स्टॉकमध्ये खरेदी दिसून येत आहे.
सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअरमध्ये खरेदी सुरू असल्याने शेअर्स वधारले आहेत. पॉवर ग्रीडचा शेअर 2.09 टक्क्यांनी वधारला होता. तर, टेक महिंद्राच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. टेक महिंद्राच्या शेअरमध्ये 3.64 टक्क्यांची घसरण दिसून आली.
वधारणारे शेअर्स
आयटीसी (2.33 टक्के), बजाज फिनसर्व (2.04 टक्के), कोटक महिंद्रा बँक (1.96 टक्के), बजाज फायनान्स (1.95 टक्के), अॅक्सिस बँक (1.70 टक्के), भारती एअरटेल (1.09 टक्के), एचडीएफसी बँक (1.03 टक्के) या शेअरमध्ये सकाळच्या सत्रात तेजी दिसून आली.
घसरण झालेले शेअर्स
टेक महिंद्रा (3.08 टक्के), टाटा स्टील (0.34 टक्के), सन फार्मा (0.01 टक्के), अदानी पोर्ट्स (0.24 टक्के), अल्ट्राटेक सिमेंट (0.15 टक्के), ब्रिटानिया (1.06 टक्के) या शेअर्समध्ये घसरण झाली.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजार कसा होता?
प्री-ओपनिंग सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली. निफ्टी 17500 अंकांवर गेला होता. सकाळी 9.01 वाजता सेन्सेक्स 365.59 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टी 62.80 अंकांनी वधारला.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Budget 2022 Share Market : अर्थसंकल्पातील घोषणांनी 'हे' शेअर वधारण्याची शक्यता; तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?
- Budget 2022: अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय कर दिलासा नाही; अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या...
- Union Budget 2022 : NPS ग्राहकांसाठी खूशखबर, गुंतवणुकीवर कर कपात 14 टक्के करण्याचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha