(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening : शेअर बाजाराची सपाट सुरुवात, सेन्सेक्ससह निफ्टीही गडगडला, खरेदी-विक्रीमध्ये गुंतवणूकदार अडचणीत
Share Market Opening Bell : आज शेअर बाजाराची सपाट सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर आता सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहेत.
Stock Market Opening Bell : आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. आज शेअर बाजार सपाट उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) 75 अंकांनी घसरल्याचे पाहायला मिळाले. आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 61294 वर आणि निफ्टी (Nifty 50) 18230 वर उघडला. सेन्सेक्समध्ये 75 अंकांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात विक्रीचा दबाव आहे. दबाव असूनही इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एसबीआय, हिंदुस्थान युनिलिव्हर या शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.
गुंतवणूकदारांकडून विक्रीवर जोर
टाटा स्टील, पॉवरग्रीड, इन्फोसिस आणि टाटा मोटर्स या शेअर्समध्ये घसरण झाली. टाटा स्टील, टाटा मोटर्स, इन्फोसिस शेअर्सवर गुंतवणुकदाराकडून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंगळवारी बंद झालेल्या अंकांवर सेन्सेक्स आणि निफ्टी उघडला. गुंतवणूकदारांना कालच्या पातळीवरच व्यवसाय पाहायला मिळत आहे.
गुंतवणूकदारांवर जागतिक बाजाराचा दबाव
बुधवारी भारतीय शेअर बाजाराने किरकोळ घसरणीसह व्यवहाराला सुरुवात पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांवर जागतिक बाजाराचा दबाव स्पष्टपणे दिसून येत आहे. बाजारात फ्लॅट उघडल्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केली आणि शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. मागील दोन दिवस शेअर बाजारा घसरणीसह सुरु होऊनही तेजीसह बंद झाल्याचं पाहायला मिळालं. आता आज काय होतं हे पाहावं लागेल.
जागतिक बाजारपेठेची स्थिती काय?
जागतिक बाजारात किंचित घसरण पाहायला मिळली आहे. डाऊ जोन्समध्ये 11 अंकांनी घसरला. 2022 मधील यूएस बाजाराची कामगिरी 2008 नंतरची सर्वात कमकुवत होती. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात केलेली वाढ हे याचे सर्वात मोठे कारण आहे. डॉलर निर्देशांक 104.36 वर आहे. क्रूडची किंमत 4 टक्क्यांनी घसरली. क्रूड ऑईलची किंमत प्रति बॅरल 82 डॉलरच्या खाली घसरली आहे.
'या' शेअर्समध्ये तेजी
गुंतवणूकदारांनी आज बाजारात सुरुवातीपासूनच इंडसइंड बँक (IndusInd Bank), ब्रिटानिया (Britannia), सन फार्मा (Sun Pharma), बीपीसीएल (BPCL) आणि एशियन पेंट्स (Asian Paints) यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आणि सततच्या गुंतवणुकीमुळे हे शेअर्स टॉप गेनर्सच्या यादीत आले.
'हे' शेअर्स गडगडले
हिंडाल्को (Hindalco), नाल्को (Nalco) आणि वेदांता (Vendanta) हे आज बाजारातील सर्वात जास्त नुकसान भोगणारे शेअर्स आहेत. हिंडाल्कोचे शेअर्स 3.05 टक्क्यांनी घसरले आहेत. नाल्को 2.77 टक्के आणि वेदांत 2.61 टक्क्यांनी घसरले आहेत. बँकिंग शेअर्समध्येही कालच्या तुलनेत घसरण पाहायला मिळत आहे. सर्वात मोठी घसरण इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या शेअरर्शमध्ये दिसून आली आहे.