(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening Bell: शेअर बाजारात खरेदीचे संकेत; सेन्सेक्स 392 अंकांनी वधारला
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज खरेदीचे संकेत दिसत असून बाजार वधारला आहे.
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज प्री-ओपनिंग सत्रात खरेदीचे संकेत दिसून आले. शेअर बाजारात (Share Market) आजही सकारात्मक सुरुवात झाली. सेन्सेक्स (Sensex) 392 अंकांनी वधारला असून निफ्टीत (Nifty) 119 अंकांची तेजी दिसून आली. आशियाई बाजारात सकारात्मक संकेत दिसून आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात तेजी दिसली.
शेअर बाजारातील मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 248.58 अंकांच्या तेजीसह 58,314 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 104.95 अंकांच्या तेजीसह 17,379 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 396 अंकांच्या तेजीसह 58,461.50 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 123 अंकांच्या तेजीसह 17,397.45 अंकावर व्यवहार करत होता. शेअर बाजारात आज गॅप अपने सुरुवात झाली. मंगळवारीदेखील बाजाराची सुरुवात गॅपने झाली होती. मंगळवारी बाजारात चांगली तेजी दिसून आली.
आज वित्तीय क्षेत्रातील शेअर्समध्ये किंचीत विक्री दिसून येत आहे. एफएमसीजी सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे. तर, उर्वरिती सर्व सेक्टरचे निर्देशांक वधारले आहेत. मीडिया सेक्टरमध्ये 1.90 टक्क्यांची तेजी दिसत आहे. आयटी, पीएसयू बँक, रियल्टी आणि ऑइल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे.
सेन्सेक्समधील 30 पैकी 7 स्टॉकच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. तर, 23 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आहे. तर, निफ्टीतील 50 पैकी 46 शेअरच्या दरात तेजी दिसत आहे. त्यापैकी 4 शेअर्सच्या दरात घसरण दिसून येत आहे.
सेन्सेक्समध्ये एचएसीएल टेक, एल अॅण्ड टी, टाटा स्टील, इन्फोसिस, एनटीपीसी, सन फार्मा, टेक महिंद्रा, एसबीआय, मारुती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी, एचयूएल आणि बजाज फायनान्सच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
प्री-ओपनिंग सत्रात, निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 218 अंकांनी तेजी दिसून आली. तर, निफ्टीत 86 अंकांची तेजी दिसून आली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: