एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज अस्थिरतेचे संकेत; सेन्सेक्स वधारला, बँक निफ्टीची उच्चांकी भरारी

Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज तेजीसह झाली असली तरी बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.

Share Market Opening Bell:  शेअर बाजारातील व्यवहार आज तेजीसह सुरू झाले. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारले. तर, बँक निफ्टी (Bank Nifty) निर्देशांकाने आतापर्यंतचा उच्चांक (Bank Nifty All Time High) गाठला असून 42000 अंकांनजिक खुला झाला. बाजार सुरू झाल्यानंतर मात्र विक्रीचा दबाब दिसून आल्याने निर्देशांकात काही प्रमाणात घसरण झाली. 

बँक निफ्टीने ऑलटाइम उच्चांक गाठला. बँक निफ्टी 0.35 टक्क्यांनी वधारत 41832 अंकांच्या पातळीवर खुला झाला.  

आज शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 119.4 अंकांनी वधारत  61,304.29 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 85.45 अंकांच्या तेजीसह 18,288 अंकांवर खुला झाला. त्यानंतर नफावसुलीचे संकेत दिसू लागले. सकाळी 10.25 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 3 अंकांच्या घसरणीसह 61,181.70 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 7.40 अंकांनी वधारत 18,210.20 अंकांवर व्यवहार करत होता. 

आज, सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँक, एचसीएल टेक, आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, कोटक महिंद्रा बँक, एल अॅण्ड टी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, विप्रो, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्समध्ये खरेदीचा जोर दिसून येत आहे. 

प्री-ओपनिंगमध्ये कसा प्रतिसाद?

प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली. सेन्सेक्स 2.74 अंकांनी वधारत 61187 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 31.65 अंकांनी वधारत 18234 अंकांवर व्यवहार करत होता. 

आज बाजार कसा असेल?

शेअर इंडियाचे उपाध्यक्ष, संशोधन प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी सांगितले की, आज बाजार 18200-18600 या दरम्यान व्यवहार करण्याची शक्यता आहे. बाजारात तेजीचा अंदाज त्यांनी वर्तवला. आज, पीएसयू बँक, मेटल, ऑटो, रियल्टी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसण्याची शक्यता आहे. तर, आयटी, फार्मा, मीडिया, एफएमसीजी आणि इन्फ्रामध्ये विक्री दिसून येऊ शकते. 

आज दिवसभरातील व्यवहारात बँक निफ्टी 41500-42000 या पातळी दरम्यान व्यवहार करू शकतो. बँक निफ्टीत तेजी दिसून येऊ शकते, असा अंदाज त्यांनी वर्तवला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
आठ वेळा अपयश आलं, तरीही यश मिळवून दाखवलं, लढला आणि शेवटी जिंकलाही, शेतकऱ्याचा मुलगा UPSC मध्ये भारतात चौथा  
E20 Petrol : पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 31.2 टक्के आढळलं, कर्नाटक सरकारच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर
पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 31.2 टक्के आढळलं, कर्नाटक सरकारच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर  
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul President Election 2026 : मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
मुश्रीफांनी पाठिंबा मागणं हास्यास्पद; त्यांना हे शोभत नाही...., गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांना दिलेल्या ऑफरवर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया
Nashik Crime News: सैराटची पुनरावृत्ती; बहिणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरूणाला स्मशानभूमीजवळ भेटायला बोलावलं, पोटावर, गळ्यावर, छातीवर अन् हातावर वार केले, त्र्यंबकेश्वर हादरलं!
सैराटची पुनरावृत्ती; बहिणीशी प्रेमसंबंध असलेल्या तरूणाला स्मशानभूमीजवळ भेटायला बोलावलं, पोटावर, गळ्यावर, छातीवर अन् हातावर वार केले, त्र्यंबकेश्वर हादरलं!
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले
Agristack : महायुती सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी... 
फडणवीस सरकारचा ॲग्रीस्टॅकबाबत मोठा निर्णय,  'या' शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी...
IND vs NZ : दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय, भारताकडे मालिकेत आघाडी घेण्याची संधी
दुसऱ्या वनडेला पावसाचा फटका, मॅच 47-47 षटकांची होणार, शुभमन गिलनं टॉस जिंकत घेतला मोठा निर्णय
Share Market : अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 35 वर्षातील दमदार कामगिरी, सलग 7 सत्रात 10 टक्के तेजी...
अमेरिकन स्टॉक मार्केट क्रॅश, भारतीय शेअर बाजारात दिवाळीचं तेज, 7 दिवसात 35 वर्षातील दमदार कामगिरी
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
Embed widget