एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा दबाव, सेन्सेक्समध्ये घसरण, निफ्टीमध्ये तेजी

Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसत असून सेन्सेक्समध्ये घसरण दिसत असून निफ्टी किंचीत वधारला आहे.

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहारांवर आज नफावसुलीचा दबाव दिसत आहे. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीत (Nifty) घसरण झाल्याचे दिसून आले. मात्र, बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीचा जोर दिसल्याने बाजार सावरला. सेन्सेक्स घसरणीसह (Sensex Fall) खुला झाला. तर निफ्टी किंचिंत वधारत खुला झाला. जागतिक पातळीवरील  शेअर बाजारातून भारतीय शेअर बाजाराला (India Share Market) फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून आले. 

सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात विक्रीचा दबाव असल्याचे दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE) सेन्सेक्स 29.18 अंकांच्या घसरणीसह 61,765.86 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (NSE) निफ्टी 26.70 अंकांनी वधारत 18,376.40 अंकांवर खुला झाला. सकाळी 10.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 46.43 अंकांच्या घसरणीसह 61,748.61 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 14.30 अंकांच्या तेजीसह 18,364.00 अंकावर व्यवहार करत होता. 

सकाळच्या सुमारास, सेन्सेक्समधील 30 पैकी  19 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. तर, 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे. निफ्टीमध्ये 50 पैकी 31 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती.

सेन्सेक्समध्ये पॉवरग्रीड, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एनटीपीसी, टीसीएस, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, विप्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, मारुती, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी आणि नेस्लेच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

'शेअर  इंडिया'चे उपाध्यक्ष, संशोधन विभाग प्रमुख डॉ. रवी सिंह यांनी म्हटले की, 18200-18500 अंकांच्या दरम्यान बाजार व्यवहार करण्याची शक्यता आहे. बाजारात आज चढ-उतार दिसण्याची शक्यता आहे. रियल्टी, आयटी, बँक, वित्तीय सेव३ा आणि मीडियाच्या शेअरमध्ये खरेदीचा जोर दिसू शकतो. तर, ऑटो, पीएसयू बँक, एनर्जी, इन्फ्रा आणि फार्माच्या शेअर दरात घसरण दिसू शकते. 

प्री-ओपनिंग सत्रात बाजार कसा होता?

शेअर बाजारात प्री-ओपनिंग सत्रात घसरण दिसून आली होती.  सेन्सेक्स निर्देशांक 345 अंकांच्या घसरणीसह 61449.77 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी  67.40 अंकांच्या घसरणीसह 18282.30 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. SGX Nifty देखील प्री-ओपन मार्केटमध्ये 19 अंकांच्या तेजीसह 18452.50  अंकांवर व्यवहार करत होता. 

महत्त्वाच्या बातम्या

कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
Gold Silver Rate Hike: अमेरिकेनं इराणवरी हल्ले थांबवताच सोने-चांदीच्या दरांत मोठी उसळी; सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यात, तर चांदीचे दर थेट 10 हजारांनी वाढले
सोन्या-चांदीच्या दरांत मोठी उसळी, सोनं प्रति तोळा दीड लाखांच्या उंबरठ्यावर, तर चांदीचे दर 10 हजारांनी वाढले
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
एकाच दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर 
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget