एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात घसरगुंडी; नफावसुली जोरात, सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली असून सेन्सेक्स 200 हून अधिक अंकांनी घसरला.

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीने झाली आहे. शेअर बाजारात (Share Market) नफावसुलीचे संकेत दिसत असून बाजारातील घसरण कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय शेअर बाजारासाठी एसजीएक्स निफ्टी निर्देशांकाकडून (SGX Nifty) नकारात्मक संकेत मिळत होते. अमेरिकन शेअर बाजारदेखील घसरणीसह बंद झाला होता. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Indian Share Market) दिसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. 

आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराला सुरुवात झाली तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 197 अंकांच्या घसरणीसह 61,608.85 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 80.15 अंकांच्या घसरणीसह 18,340.30 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 447 अंकांच्या घसरणीसह 61,358.41 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 119 अंकांच्या घसरणीसह 18,301.05 अंकांवर व्यवहार करत होता. 

सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी फक्त एकाच कंपनीच्या शेअर दरात किंचीत तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात तेजी दिसली होती. तर, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया, एचडीएफसी, भारती एअरटेल, पॉवरग्रीड, टाटा मोटर्सच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.

निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 3 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 47 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे. निफ्टीत अदानी एंटरप्रायझेस, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, हिंदाल्को, टेक महिंद्रा, आयशर मोटर्स, एचसीएल टेक, एशियन पेंट्स आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. 

प्री-ओपनिंग सत्रात बाजार कसा होता?

शेअर बाजारात आज प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांक 27.31 अंकांच्या घसरणीसह 61,778 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 55.45 अंकांच्या घसरणीसह 18365 च्या पातळीवर व्यवहार करत होता.  

सोमवारी बाजारात तेजी

सोमवारी, शेअर बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) जवळपास एक टक्क्यांची तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 468.38 अंकांनी वधारत 61,806.19 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी  151.45 अंकांनी वधारत 18,420.45 अंकांवर स्थिरावला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला  
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला
Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
Nashik Godavari : एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Arrested: Suresh Dhasयांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटकPankaja Munde On Suresh Dhas : पक्षश्रेष्ठींनी आमदार धस यांना समज द्यावी : पंकजा मुंडेAjit Pawar Tribute Yashwantrao Chavan : अजित पवारांची प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीAjit Pawar PC Pritisangam : सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवणी चव्हाण साहेबांनी दिली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला  
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला
Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
Nashik Godavari : एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
Ajit Pawar : महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
महाराष्ट्राला सहन होणार नाहीत अशी वक्तव्ये दोन्हीकडून होत आहेत ते परवडणार नाही; अजितदादांकडून वाचाळांना कानपिचक्या
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडने उज्ज्वल निकमांसमोर वकीलांची फौज उभी केली, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय!
वाल्मिक कराडने उज्ज्वल निकमांसमोर वकीलांची फौज उभी केली, सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय!
Embed widget