एक्स्प्लोर

Share Market Closing Bell: सकाळच्या घसरणीनंतर बाजारात तेजी; बँकिंग, एनर्जी शेअर्समध्ये खरेदीचा जोर

Share Market Closing Bell: शेअर बाजारातील व्यवहार बंद होताना आज तेजी दिसून आली. बँकिंग, एनर्जी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला.

Share Market Closing Bell: सकाळी घसरणीसह सुरुवात झालेला शेअर बाजार तेजीसह बंद झाला. दिवाळीच्या एक आठवड्याआधी बाजार खरेदीचा जोर दिसला. बँकिंग (Banking) आणि एनर्जी (Energy) कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. या सेक्टरमधील खरेदीमुळे बाजार तेजीत बंद झाला. आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 492 अंकांच्या तेजीसह 58,410 अंकांवर तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 134 अंकांच्या तेजीसह 17,320  अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारातील व्यवहार सकाळी सुरू झाले तेव्हा बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला होता. सुरुवातीच्या एक-दोन तासानंतर बाजार सावरू लागला. आज दिवस व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, एनर्जी, फार्मा, एफएमसीजी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. तर, मेटल्स, रिअल इस्टेट आणि मीडिया सेक्टरमधील शेअर दरात विक्रीचा सपाटा दिसून आला. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमधील शेअर दरात खरेदी दिसून आली.  

निफ्टी 50 मधील 34 कंपन्यांच्या शेअर दरात खरेदी दिसून आली. तर, 16 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, सात कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसली. 

आज बाजारात एसबीआय 3.20 टक्के, बजाज फिनसर्व्ह 2.05 टक्के, अॅक्सिस बँक 1.97 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.84 टक्के, एनटीपीसी 1.64 टक्के, इंडसइंड बँक 1.58 टक्के, रिलायन्स इंडस्ट्री 1.44 टक्के, कोटक महिंद्रा 1.39 टक्क्यांची तेजी दिसून आली. 

शेअर बाजारात नफावसुलीही दिसून आली. यामध्ये हिंदाल्को 2.23 टक्के, लार्सन 1.49 टक्के, जेएसडब्लू स्टील 1.37 टक्के, एचसीएल टेक 0.79 टक्के,  विप्रो 0.58 टक्के, टाटा स्टील 0.55 टक्के, ब्रिटानिया 0.49 टक्के, बीपीसीएल 0.44 टक्के, पॉवरग्रीड 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. 

सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर निफ्टीतील 50 पैकी 11 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसली. तर, 39 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली होती. 

प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांक 288 अंकांच्या घसरणीसह 57631 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक  91.25 अंकांच्या घसरणीसह 17094  अंकांवर व्यवहार करत होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Gold and Silver Rates: सोन्याच्या भावात चकाकी, चांदीही महागली; दर पुन्हा गडाडले, आजचा 24 कॅरेट 1 तोळे सोन्याचा दर किती?
सोन्याच्या भावात चकाकी, चांदीही महागली; दर पुन्हा गडाडले, आजचा 24 कॅरेट 1 तोळे सोन्याचा दर किती?
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
Sushma Andahre On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Nitin Gadkari ethanol: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
Wasim Jaffer Picks Team India Playing XI For ODI World Cup 2027: बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Prakash Mahajan: बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
बाळासाहेब वाघ होते, त्यांचा नातू स्वत:ला झुरळ म्हणतोय; प्रकाश महाजनांची बोचरी टीका, राज ठाकरेंवरही हल्लाबोल
Embed widget