एक्स्प्लोर

Share Marker Closing Bell: नववर्षातील पहिल्याच दिवशी शेअर बाजारात खरेदीचा जोर; या स्टॉक्समुळे तेजी

Share Marker Closing Bell: शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांकडून खरेदीचा उत्साह दिसला. सेन्सेक्स निर्देशांक 327 अंकांनी तर निफ्टी निर्देशांक 92 अंकांनी वधारत बंद झाला.

Share Marker Closing Bell:  नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारला. शेअर बाजारातील तेजीमुळे सेन्सेक्स निर्देशांकाने (BSE Sensex) 61 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. शेअर बाजारातील व्यवहार बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 327 अंकांच्या तेजीसह  61,168 अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (NSE Nifty) 92 अंकांच्या तेजीसह 18,197 अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारातील दिवसभरातील व्यवहार करणाऱ्या 2254 कंपन्याच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1245  कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. 177 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. शेअर बाजारातील आज दिवसभरातील व्यवहारात मेटल्स स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. मेटल्स स्टॉक्समध्ये तीन टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, रिअल्टीच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची तेजी दिसली. चीनने देशातंर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी निर्यात शुल्कात वाढ केली. त्याच्या परिणामी मेटल्सच्या स्टॉकमध्ये तेजी दिसून आली आहे. 

निफ्टी निर्देशांकात टाटा स्टील, हिंदाल्को, ओएनजीसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून आली. टायटन, एशियन पेंट्स, डिव्हिज लॅब, बजाज ऑटो आणि हिरो मोटो कॉर्पच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 

आज शेअर बाजारात बँकिंग, ऑटो, आयटी, मेटल्स, एनर्जी, रिअल इस्टेटमधील सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला. तर, फार्मा, हेल्थकेअर आणि ग्राहकोपयोगी वस्तू सेक्टरच्या शेअर दरात घसरण दिसून आली. 

मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. निफ्टी 50 मधील 30 कंपन्यांच्या शेअर दरात खरेदीचा उत्साह दिसला. तर, 20 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर, सेन्सेक्समधील 30 पैकी 22 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

आज बाजारात दिसून आलेल्या तेजीच्या परिणामी मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवलही मोठ्या प्रमाणावर वाढले. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 283.85 लाख कोटी रुपये झाले. शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी बाजार भांडवल 282.44 लाख कोटी रुपये इतके होते. 

आज शेअर बाजार उघडताना बीएसई (BSE) सेन्सेक्स 30.50 अंकांच्या म्हणजेच 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 60,871.24 वर उघडला. दुसरीकडे, निफ्टी 26.40 अंकांच्या म्हणजेच 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 18,131.70 वर उघडला.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget