एक्स्प्लोर

Sensex Closing Bell : शेअर बाजारात तेजी, निफ्टी पहिल्यांदाच 20 हजार अंकांवर बंद; गुंतवणूकदारांनी कमावले 1.57 लाख कोटी

Stock Market Closing Bell : आजही मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेक्टरमधील स्टॉक्समध्ये विक्रीचा जोर दिसून आला. मात्र, बाजारातील व्यवहार बंद होण्यापूर्वी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसून आला.

मुंबई : मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीनंतर आज बुधवारी बाजारात तेजी दिसून आली. दिवसभरातील नीचांकी पातळीवरून बाजार सावरला आणि वधारत बंद झाला. आजही मिड कॅप आणि स्मॉल कॅप सेक्टरमधील स्टॉक्समध्ये विक्रीचा जोर दिसून आला. मात्र, बाजारातील व्यवहार बंद होण्यापूर्वी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसून आला. 

आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 246 अंकांनी वधारत 67,467  अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 77 अंकांच्या तेजीसह 20,070 अंकांवर बंद झाला. पहिल्यांदाच निफ्टी निर्देशांक 20 हजार अंकांच्यावर बंद झाला. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीने 20 हजार अंकांचा टप्पा गाठला होता. मात्र, 20 हजार अंकांखाली बंद होत असे. 

कोणत्या सेक्टरमध्ये चढ-उतार ?

आजच्या व्यवहारात बँकिंग शेअर्समध्ये  जोरदार वाढ झाली. निफ्टी बँक 400 अंकांच्या उसळीसह बंद झाला आहे. याशिवाय फार्मा, मेटल्स, मीडिया, एनर्जी, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर ऑटो आणि आयटी सेक्टरमधील शेअर दरात घसरण दिसून आली आहे. निफ्टी मिड कॅप तेजीसह बंद झाला. पण दिवसभरात निर्देशांक 570 अंकांनी घसरला होता. स्मॉल कॅप निर्देशांकातही विक्रीचा दबाव दिसून आला. पण दोन्ही निर्देशांक वधारत बंद झाले. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 20 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 कंपन्यांपैकी 31 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. 

इंडेक्‍स किती अंकांवर बंद दिवसभरातील उच्चांक दिवसभरातील नीचांक किती टक्के बदल
BSE Sensex 67,466.99 67,565.41 67,053.36 00:05:20
BSE SmallCap 37,296.78 37,425.97 36,549.37 0.85%
India VIX 11.83 12.05 11.54 1.18%
NIFTY Midcap 100 40,245.10 40,345.75 39,603.65 0.19%
NIFTY Smallcap 100 12,576.65 12,613.60 12,296.85 1.02%
NIfty smallcap 50 5,767.95 5,794.95 5,642.60 0.50%
Nifty 100 19,977.80 20,000.50 19,844.75 0.36%
Nifty 200 10,681.00 10,691.20 10,595.15 0.34%
Nifty 50 20,070.00 20,096.90 19,944.10 0.38%

गुंतवणूकदारांनी 1.57 लाख कोटी कमावले

मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 13 सप्टेंबर रोजी 320.23 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 12 सप्टेंबर रोजी 318.66 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 1.57 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. 

2144 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) आज, बहुतांशी कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झालेत. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,784 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 2144 शेअर्स तेजीसह बंद झाले. 1514 कंपन्यांच्या शेअर्सच्या दरात घसरण दिसून आली. तर 126 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. त्याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 148  शेअर्सने त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर  23 कंपन्यांच्या शेअर्सने त्याचा 52 आठवड्यांचा नवीन नीचांकी दर गाठला. 

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? श्रावण महिन्यात दरात घसरण होणार की वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
Gold Silver Rates Today: सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?
सोन्याच्या दरात पुन्हा पडझड; आजचा 24 कॅरेटचा भाव किती? सोने-चांदी का स्वस्त होतंय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget