Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात आजही तेजी दिसून येत आहे. जागतिक शेअर बाजारात दिसून येत असलेल्या तेजीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसत असून सेन्सेक्स (Sensex), निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारले आहेत. बँक निफ्टीने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठताना 44000 अंकांचा टप्पा ओलांडला. 


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 186 अंकांच्या तेजीसह 62,719 अंकांवर खुला झाला आहे. तर, निफ्टी 51 अंकांच्या तेजीसह 18,659 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 260 अंकांच्या तेजीसह 62,793.54 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 77 अंकांच्या तेजीसह 18,685.90 अंकांवर व्यवहार करत होता. 


निफ्टी 50 निर्देशांकातील 41 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 9 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. तर सेन्सेक्समधील 30 पैकी 23 कंपन्यांच्या शेअर दरात खरेदीचा जोर दिसत आहेत. तर, सात कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. 


सेन्सेक्समध्ये एनटीपीसी, पॉवरग्रीड, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा, डॉ. रेड्डी लॅब, एचसीएल टेक, आयटीसी कंपन्याच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, निफ्टीमध्ये हिंदाल्कोच्या शेअर दरात 2.08 टक्क्यांची तेजी दिसत आहे. आयशर मोटर्सच्या शेअर दरात 1.81 टक्के, टेक महिंद्रा 1.66 एनटीपीसीमध्ये 1.60 टक्क्यांची तेजी दिसत आहे. तर, भारती एअरटेल, नेस्ले, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अदानी पोर्टस, हिंदुस्तान युनिलिव्हर आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. 


आज, आयटी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. विप्रोच्या शेअर दरात 1.23 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, टेक महिंद्रामध्ये 0.88 टक्के, एचसीएल टेक 0.69 टक्के आणि टीसीएसच्या शेअर दरात 0.68 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. 


बँक निफ्टी (Nifty Bank) आज 44,078.60 अंकांवर खुला झाला. तर, सकाळच्या सत्रात 44,099.15 अंकांचा उच्चांक गाठल होता. स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. पंजाब नॅशनल बँक, बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.


 इतर महत्त्वाच्या बातम्या: