Viral News : आपल्या मुलीला किंवा मुलाला हवा तो नवरा मिळावा, तिला सुखी राहता येईल असे घर मिळावे, अशी प्रत्येक पालकाची मनापासून इच्छा असते. सासरच्या मंडळींनी तिचा आदर केला पाहिजे, तिच्यावर प्रेम केले पाहिजे, नवऱ्याने तिच्यावर प्रेम केले पाहिजे. यासाठी पालक आतुरतेने आपल्या मुलीसाठी तसे स्थळ शोधतात. योग्य वर मिळाल्यानंतर तिचे लग्न लावतात, परंतु आजकाल (Viral News) अशीच एक गोष्ट सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय बनली आहे. 




आई-वडिल मुलीला लग्न करून सासरी पाठवतात. पण मेघालयातील एका मुलीनं आपल्या आईसाठी असं पाऊल उचललं आहे, ज्याचं आता सर्वांकडून कौतुक होत आहे. आता या आई आणि मुलीची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलीने आपल्या 50 वर्षांच्या आईचे लग्न लावून दिलंय. मेघालयातील शिलाँग येथे राहणाऱ्या देबर्ती चक्रवर्ती या महिलेने तिच्या आईने दुसरं लग्न लावून दिलं.ही एक अतिशय उत्कृष्ट बाब असल्याचं नेटकरी (Viral News) म्हणत आहेत. नेमकं काय प्रकरण आहे जाणून घ्या.


 




लेकीनं लावलं आईचं दुसरं लग्न 
मेघालयातील शिलाँग येथे राहणारी देबर्ती चक्रवर्ती हिने तिच्या आईचं दुसरं लग्न लावलं आहे, कारण वडिलांच्या निधनानंतर आई बराच काळ एकटीच आयुष्य जगत होती. अशा परिस्थितीत देबर्तीने मोठ्या कष्टाने आईला लग्नासाठी तयार केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार देबर्तीने सांगितले की, जेव्हा ती फक्त 2 वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि तिची आई 25 वर्षांची होती. ते व्यवसायाने डॉक्टर होते. वडिलांच्या निधनानंतर देबर्ती तिच्या आईसोबत तिच्या आजीच्या घरी राहत होती.




खूप समजावून सांगितल्यानंतर आई लग्नासाठी तयार
देबर्तीच्या म्हणण्यानुसार, तिने आईला अनेकवेळा सांगितले, तसेच तिने स्वत:साठी जीवनसाथी शोधायला हवा, असे समजावून सांगितले, परंतु तिला आता या वयात जीवनसाथी मिळणार नाही असे सांगून आईने नकार दिला. मग शेवटी ती वेळ आलीच, जेव्हा देबर्तीने आईला खूप समजावून सांगितल्यानंतर दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली. रिपोर्ट्सनुसार, याच वर्षी देबर्तीच्या आईचे पश्चिम बंगालमधील रहिवासी स्वपनसोबत लग्न झाले. आता देबर्ती म्हणते की, तिची आई लग्न करून खूप आनंदी आहे




 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Wedding Viral Video : बघावं ते नवलंच! लग्नात वधूने पालखीऐवजी चक्क लगेज ट्रॉलीवरून केली एन्ट्री; नेटकरी म्हणाले...