एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात आजही अस्थिरता? सेन्सेक्स 200 अंकानी वधारला, पण...

Share Market Updates : शेअर बाजारात आजही अस्थिरता कायम राहण्याचे संकेत आहेत. शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली होती. त्यानंतर घसरण दिसून आली.

Share Market Updates: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह सुरू झाला. सेन्सेक्स निर्देशांक  200 अंकानी वधारला. तर, निफ्टीमध्ये 55 अंकाची तेजी दिसून आली आहे. मात्र, थोड्याच वेळात सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. त्यानंतर काही वेळेतच बाजार पुन्हा सावरल्याचे चित्र आहे. सेन्सेक्समध्ये आजही अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, बाजारातील व्यवहाराला सुरुवात होताच टाटा स्टीलच्या शेअर दरात घसरण झाली. टाटा स्टीलचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला. 

बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांकात 41.72 अंकाची घसरण झाली होती. सेन्सेक्स 54,282.92 अंकावर व्यवहार करत होता. तर, निफ्टीमध्ये 15 अंकाची घसरण झाली असून 16249.95 अंकावर व्यवहार करत होता. 

सेन्सेक्समधील  30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी असल्याचे दिसून येत आहे. तर, 11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे. बाजारात बँकिंग, ऑटो, फार्मा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली आहे. तर, मेटल, एनर्जी, मीडिया आणि एफएमसीजी क्षेत्रात घसरण झाल्याचे दिसत आहे.

केंद्र सरकारने मेटलवरील एक्सपोर्ट ड्युटी संदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर मेटल कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. 

आज मारुती सुझुकीच्या शेअर दरात 3.08 टक्के, महिंद्राच्या शेअर दरात 2.59 टक्के, एशियन पेंट्समध्ये 1.82 टक्के, टायटनच्या शेअर दरात 1.66 टक्के, नेस्लेच्या शेअर दरात 1.32 टक्के, एनटीपीसीच्या शेअर दरात 1.24 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

तर, आयटीसीच्या शेअर दरात 1.93 टक्के, टेक महिंद्राच्या शेअर दरात 0.56 टक्के, भारती एअरटेलमध्ये 0.40 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. 

दरम्यान,  शुक्रवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. जागतिक शेअर बाजारात मिळालेले सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसला होता. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार वधारून बंद झाला. सेन्सेक्समध्ये 1500 अंकाची उसळण दिसून आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget