Senior Citizens Savings scheme : केंद्र सरकार (Central Govt) देशातील नागरिकांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवत आहे. भारतातील प्रत्येक घटकाला डोळ्यासमोर ठेवून सरकार योजना आखत आहे. सरकार तरुण आणि वृद्धांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. भारतातील वृद्धांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून एक योजना राबविण्यात येत आहे. ज्याचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings scheme) आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात आणि या योजनेत कोणते फायदे उपलब्ध आहेत ते जाणून घेऊयात.


ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजे काय?


भारत सरकारतर्फे चालवण्यात येणारी ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही खास वृद्धांचे हित लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली योजना आहे. भारत सरकारच्या या योजनेत इतर योजनांपेक्षा जास्त व्याज दिले जात आहे. या योजनेत पैसे एकदाच गुंतवले जातात. यामध्ये जमा करावयाची रक्कम एक हजार रुपयांपासून ते 30 लाख रुपयांपर्यंत आहे.


पात्रता काय आहे?


या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. याचा अर्थ केवळ ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील लोकच याचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती स्वतःचे किंवा संयुक्त खाते उघडू शकते. यासोबतच 55 ते 60 वर्षे वयाच्या स्वेच्छानिवृत्ती घेणारे संरक्षण कर्मचारीही याचा लाभ घेऊ शकतात. यापूर्वी संरक्षण कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एक महिन्याच्या आत या योजनेत गुंतवणूक करावी लागत होती. मात्र, आता हा कालावधी वाढवून तीन महिन्यांचा करण्यात आला आहे.


या योजनेचा कला घ्याल फायदा? 


या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही तुमचे खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये, तुम्हाला खाते उघडण्यासाठी फॉर्म भरावा लागेल आणि नंतर केवायसी कागदपत्रांच्या प्रतींसह ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि वयाच्या पुराव्यासह 2 पासपोर्ट आकाराचे फोटो सबमिट करावे लागतील. यासोबतच तुम्ही SCSS योजनेअंतर्गत बँकेत खाते देखील उघडू शकता.


महत्त्वाच्या बातम्या:


पपई लागवडीला प्रोत्साहन, तब्बल 75 टक्के अनुदान, 'या' राज्य सरकारची योजना