IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाण फलंदाजांनी दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी फोडून काढताना 20 षटकांत 172 धावा केल्या.टीम इंडियासमोर मालिका विजयासाठी 173 धावांचे लक्ष्य आहे. अफगाणिस्तानकडून गुलबदिन नईबने 35 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. याशिवाय नजीबुल्लाह, करीम जन्नत आणि मुजीब उर रहमान यांनी अखेरच्या षटकांमध्ये उपयुक्त खेळी खेळली. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 बळी घेतले. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. शिवम दुबेने 1 बळी आपल्या नावावर केला. तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
अफगाणिस्तानकडून अष्टपैलू गुलबदिन नइबने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 35 चेंडूत 57 धावा केल्या. त्याने आपल्या झंझावाती खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले. गुलबदिन नईबने टीम इंडियाच्या गोलंदाजांविरुद्ध तुफानी फटके मारले. परंतु इतर फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. तुफानी खेळी खेळून गुलबदिन अक्सर पटेलचा बळी ठरला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाण संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रहमानउल्ला गुरबाज 14 धावा करून बाद झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या केवळ 20 धावा होती. यानंतर कर्णधार इब्राहिम झद्रान पॅव्हेलियनमध्ये परतला. इब्राहिम झद्रानने 10 चेंडूत 8 धावा केल्या. त्याचवेळी अफगाणिस्तान संघाला 60 धावांवर तिसरा धक्का बसला. अजमतुल्ला ओमरझाई 2 धावा करून शिवम दुबेचा बळी ठरला. शेवटच्या षटकांमध्ये नजीबुल्लाह, जन्नत करीम आणि मुजीब उर रहमान यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी खेळल्या. मात्र, मोहम्मद नबीने निराशा केली.
भारताकडून अर्शदीप सिंग हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अर्शदीप सिंगने 4 षटकात 32 धावा देत 3 फलंदाजांना बाद केले. टीम इंडिया हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली तर मालिका जिंकेल. मात्र अफगाणिस्तान संघ जिंकल्यास 3 टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत राहील. याआधी भारतीय संघाने मोहालीत अफगाणिस्तानचा 6 विकेटने पराभव केला होता. उभय संघांमधला तिसरा म्हणजेच शेवटचा टी-20 सामना 17 जानेवारीला बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या