Papaya Farming: केंद्र सरकारबरोबरच विविध राज्य सरकारे देखील शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आखत आहेत. बिहार सरकारनेही (Bihar Govt) अशीच एक चांगली योजना सुरु केली आहे. ही योजना राज्यातीस पपई उत्पादक (Papaya Farming) शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. सरकारने पपई लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी बांधवांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. पपई लागवडीसाठी तब्बल 75 टक्क्यांचं अनुदान शेतकऱ्यांना दिलं जात आहे.

  


देशभरात विविध फळांची लागवड केली जाते. बिहारमध्येही अनेक प्रकारच्या फळांची लागवड केली जाते. आता सरकारने पपई लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी बांधवांना अनुदान देण्यास सुरुवात केली आहे. त्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बंपर अनुदान मिळणार आहे. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 


पपई शेती अतिशय फायदेशीर


पपई शेती हा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे. पपई हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे. जे जगभरात खाल्ले जाते. बागायती क्षेत्रात पपई लागवडीची चांगली क्षमता पाहून बिहार सरकार राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. या अंतर्गत पपईच्या बागांची लागवड करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना भरघोस अनुदान देते.


तुम्हाला कसा फायदा मिळेल?


एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत पपई लागवडीसाठी शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जात आहे. राज्य सरकारने पपई लागवडीचा एकक खर्च 60000 रुपये प्रति हेक्टर ठरवला आहे. यावर शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान म्हणजे  45,000 रुपयांचं अनुदान मिळत आहे. एक हेक्टरमध्ये पपईची लागवड करण्यासाठी केवळ 15,000 रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना येणार आहे.


कुठे अर्ज करायचा?


ज्या शेतकरी बांधवांना राज्यात पपईची लागवड करायची आहे आणि त्यांना शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी horticulture.bihar.gov.in या अधिकृत साइटला भेट देऊन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी शेतकरी बांधव अधिकृत संकेतस्थळावर किंवा जवळच्या फलोत्पादन विभागाच्या कार्यालयाशीही संपर्क साधू शकतात.


महत्त्वाच्या बातम्या:


पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पपईला विक्रमी उच्चांकी भाव, जळगावातील शेतकऱ्याला वर्षातच एकरात सहा लाख रुपये उत्पन्न