एक्स्प्लोर

SBI ATM Rules : 1 ऑक्टोबरपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; बँकेची मोठी घोषणा

SBI ATM Cash Withdrawal Rules : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी 1 ऑक्टोबर पासून एटीएम आणि रोख रक्कमेच्या व्यवहारांच्या नियमात बदल होणार असून ठराविक मर्यादेनंतर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

SBI New ATM Withdrawal Charges : 15 ऑक्टोबरपासून यूपीआय (UPI) व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लागू होण्याच्या चर्चेदरम्यान, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणाऱ्या 'भारतीय स्टेट बँकेने' (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने 1 ऑक्टोबर 2026 पासून कॅश काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, ठरवून दिलेल्या मोफत मर्यादेपेक्षा (Free Limit) जास्त वेळा पैसे काढल्यास ग्राहकांच्या खिशाला अतिरिक्त फटका बसणार आहे.

SBI BSBD Account Rules : कोणावर परिणाम?

एसबीआयने स्पष्ट केले आहे की, हा नियम बँकेच्या सर्व खातेदारांना लागू होणार नाही. हा बदल प्रामुख्याने बँकेच्या शाखांद्वारे उघडण्यात आलेल्या Basic Savings Bank Deposit (BSBD) म्हणजेच बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खात्यांशी संबंधित ग्राहकांसाठी लागू करण्यात आला आहे.

SBI Free ATM Limit : महिन्यातून किती वेळा पैसे काढणे राहणार फ्री?

भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2026 नंतरही BSBD खातेदारांना दरमहा ठराविक मर्यादेत मोफत पैसे काढण्याची सोय कायम राहील.

4 वेळा पैसे काढणे मोफत : महिन्यातून एकूण 4 वेळा (एटीएम किंवा बँक शाखेतून) पैसे काढणे पूर्णपणे मोफत असेल.

4 व्यवहारांनंतर शुल्क : 4 वेळा मोफत मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त रोख व्यवहारावर 15 रुपये शुल्क आकारले जाईल.

जीएसटी (GST) लागू : या 15 रुपयांच्या शुल्कासोबतच ग्राहकाला लागू असणारा जीएसटी (GST) देखील अतिरिक्त भरावा लागेल.

SBI Digital Transaction Rules : डिजिटल व्यवहारांवर शुल्क लागेल का?

एसबीआयच्या ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या बदललेल्या नियमांचा डिजिटल व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहक आधीप्रमाणेच यूपीआय (UPI), नेट बँकिंग किंवा डिजिटल पेमेंटद्वारे कितीही वेळा मोफत व्यवहार करू शकतात. त्यावर कोणतीही मर्यादा किंवा अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

SBI AePS Transaction Changes : आधार सक्षम पेमेंट सिस्टीमच्या नियमातही बदल

बँकेने आधार सक्षम पेमेंट सिस्टीम म्हणजेच AePS (Aadhaar Enabled Payment System) द्वारे होणाऱ्या व्यवहारांच्या नियमांमध्येही मोठा बदल केला आहे. आधी AePS द्वारे केलेल्या कॅश व्यवहारांना डिजिटल व्यवहार मानले जायचे आणि त्यांना 4 मोफत व्यवहारांच्या मर्यादेत धरले जात नव्हते. मात्र, आता बँकेने ही सूट काढून घेतली आहे. म्हणजेच AePS द्वारे काढलेली रोख रक्कमही आता महिन्यातून मिळणाऱ्या 4 मोफत व्यवहारांच्या मर्यादेतच मोजली जाईल.

SBI Financial Performance : एसबीआयच्या व्याजाचे दर आणि नफ्यात वाढ

यापूर्वी एसबीआयने ऑगस्ट महिन्यात 3 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या बल्क फिक्स्ड डिपॉझिटवरील (Bulk FD) व्याजाचे दर 15 ऑगस्टपासून सुधारित केले होते. याशिवाय, चालू आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) बँकेचा निव्वळ नफा (Net Profit) 10.23% ने वाढून 21,121 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत 19,160 कोटी रुपये होता.

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; दर अजून घसरणार, नेमकी स्थिती काय?
सराफा बाजारात मोठी उलथापालथ! दहा महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 61 टक्क्यांनी घसरण; दर अजून घसरणार, नेमकी स्थिती काय?
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
Narendra Modi : 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ केला, तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? मोदींचा उद्योजकांना थेट सवाल...
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Advertisement

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Mumbai Crime: मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रमोशनपूर्वी अचानक बदली, महिला सहकाऱ्याकडून पोलीस ठाण्यात फटाके वाजवून सेलिब्रेशन, नेमकं काय घडलं?
मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रमोशनपूर्वी अचानक बदली, महिला सहकाऱ्याकडून फटाके वाजवून सेलिब्रेशन, नेमकं काय घडलं?
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
Embed widget