Success Story: जगात असे अनेक श्रीमंत लोक आहेत ज्यांच्या मुलांना मोठा व्यवसाय आणि पैसा वारसाने मिळतो. पण, असे काही वडील आहेत जे आपल्या मुलांना व्यवसाय सोपवण्यापूर्वी त्यांना संघर्ष आणि यशाचा मार्ग समजावून सांगतात. आज आम्ही तुम्हाला सूरतमधील एका प्रसिद्ध हिरे व्यावसायिकाच्या यशोगाथेबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्याने आपल्या मेहनतीने करोडो आणि अब्जावधी रुपयांचे व्यवसायाचे साम्राज्य निर्माण केले आहे. पण, व्यवसायातील युक्त्या शिकण्यासाठी आपल्या मुलाला छोटी-मोठी नोकरी करण्यास सांगितले. सावजी धनजी ढोलकिया असं या उद्योजकाचं नाव आहे.  


एक उदार उद्योजक म्हणून


सावजी धनजी ढोलकिया यांना गुजरातमधील सुरत शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं जातं. ते देशातील आघाडीचे हिरे व्यापारी आहेत. हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संस्थापक आणि अध्यक्ष सावजी धनजी ढोलकिया हे एक उदार उद्योजक म्हणूनही ओळखले जातात. कारण दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार आणि फ्लॅटसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.


अफाट संपत्ती पण मुलाला नोकरी करायला सांगितलं


1992 मध्ये सावजी धनजी यांनी त्यांच्या 3 भावांसह सुरतमध्ये हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. तेव्हापासून कंपनीचा विस्तार सुरूच आहे. 6500 कर्मचार्‍यांसह, हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हे हिरे व्यवसायात अग्रगण्य नाव बनले आहे. अफाट संपत्ती आणि प्रसिद्धी मिळूनही सावजी धनजी ढोलकिया हे नम्र व्यक्ती असल्याचे म्हटले जाते. आपल्या कर्मचाऱ्यांची खूप काळजी घेणाऱ्या सावजींनी आपल्या मुलाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास सांगितले.


बेकरीमध्ये दिवसाला 200 रुपये पगारावर नोकरी


सावजी धनजींनी आपला मुलगा द्रव्याला कुटुंबाचे नाव आणि ओळख न वापरता स्वतंत्रपणे काम करण्यास प्रोत्साहित केले. वडिलांच्या सल्ल्यानुसार, द्रव्याने चपलांचे दुकान, मॅकडोनाल्ड आणि कॉल सेंटरसह विविध नोकऱ्या केल्या. आर्थिक संघर्षाचा सामना करत द्राव्याने जीवनातील सर्वात मौल्यवान धडे शिकले. वडिलांची कोट्यवधींची संपत्ती असूनही, द्रव्या एका बेकरीमध्ये दिवसाला 200 रुपये पगारावर काम करत होता.


दरवर्षी कर्मचार्‍यांना महागड्या भेटवस्तू वितरित 


सावजी धनजींनी आपल्या मुलाला जीवनातील युक्त्या शिकण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास सांगितले असले तरी मात्र, ते कर्मचार्‍यांसाठी नेहमीच उदार होते. ते त्यांच्या कर्मचार्‍यांना देत असलेल्या दिवाळी बोनससाठी ओळखले जातात. बोनस म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांना दागिने, कार आणि फ्लॅट यांसारख्या भव्य भेटवस्तू दिल्या. ऑक्टोबर 2018 मध्ये, त्याने पात्र कर्मचाऱ्यांना 600 कार भेट देऊन चर्चेत आणले. डीएनए रिपोर्टनुसार सावजी धनजी ढोलकिया यांची एकूण संपत्ती 12,000 कोटी रुपये आहे.


यापूर्वी 2016 मध्ये सावजी धनजी यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1,260 कार भेट दिल्या होत्या. अशा बोनसमागील त्याच्या प्रेरणांबद्दल विचारले असता, ते म्हणाले की प्रत्येकाचे स्वतःचे घर आणि कार असण्याचे स्वप्न असते. म्हणून मी फक्त माझ्या कर्मचाऱ्यांना हे स्वप्न साकार करण्यास मदत करतो.


महत्त्वाच्या बातम्या:


पैशासाठी कोणाकडे हात पसरु नका, खात्यात झिरो बॅलन्स असतानाही बँक देते 10000 रुपये; जाणून घ्या प्रक्रिया