एक्स्प्लोर

Polymer Currency:  रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...

Polymer Currency:  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांच्याकडून प्लास्टिकच्या नोटा चलनात आणल्या जाणार असल्याच्या चर्चांवर भाष्य करण्यात आलं आहे.

Polymer Currency मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण विषयक समितीकडून रेपो रेटमध्ये बदल न करता 5.25 टक्के कायम ठेवण्यात आला. गेल्या काही दिवसांमध्ये आरबीआयकडून प्लास्टिक किंवा पॉलिमरच्या नोटा चलनात आणल्या जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. ते म्हणाले तो विषय सध्या विचाराधीन असून प्रारंभिक टप्प्यात आहे. यामुळं आरबीआय प्लास्टिकच्या नोटांबाबत विचार करतेय हे स्पष्ट झालंय. मात्र, आरबीआय प्लास्टिकच्या नोटा कधी आणणार हे मात्र निश्चित झालं नाही. 

आरबीआयनं प्लास्टिक नोटांवर काय म्हटलं?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांना आज प्लास्टिकच्या नोटांसदर्भात विचारण्यात आलं आहे. यावर बोलताना संजय म्हलोत्रा यांनी प्लास्टिकच्या नोटांबाबत आरबीआयचा विचार सुरु असल्याच्या बातम्या खऱ्या आहेत, असं म्हटलं. मात्र, पॉलिमरच्या नोटांचा विषय सध्या विचाराधीन असल्याचं देखील ते म्हणाले. पॉलिमरच्या नोटांचा प्रस्ताव विचाराधीन असून त्याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाही, असं म्हलोत्रा म्हणाले. पॉलिमरच्या नोटांचे फायदे आणि नुकसान याबाबत विचार सुरु असून तो विषय विचाराधीन असल्याचं देखील संजय म्हलोत्रा म्हणाले. 

2012 मध्ये पॉलिमर नोटांचा प्रकल्प अयशस्वी 

भारत सरकारनं फेब्रुवारी 2012 मध्ये देशातील 5 शहरांमध्ये पॉलिमर किंवा प्लास्टिकच्या नोटांचा  पायलट प्रोजक्ट राबवला होता. कोची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला या शहरात 10 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटांची चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी एटीएम आणि मशीनच्या कारणांमुळं अडचणी आल्यानं  तो प्रकल्प थांबवण्यात आला होता. 

पॉलिमर करन्सी म्हणजे काय?

पॉलिमर करन्सीमध्ये पॉलिमर बँक नोट लवचिक प्लास्टिक सबस्ट्रेटपासून बनवल्या जातात. त्या नोटा  Bi-axially Oriented Polypropylene (BOPP) पासून बनवल्या जातात. त्या कार्ड सारख्या जाड नसतात. यामुळं त्याची कागदाच्या नोटांसारखी घडी करता येते.  

प्लास्टिकच्या नोटांची वैशिष्ट्ये

प्लास्टिकच्या नोटा अधिक टिकाऊ असतात. त्या नोटांचा कागदाच्या नोटांपेक्षा जास्त काळ टिकतात. यामुळं वारंवार नोटांची छपाई करावी लागत नाही.   

कोणत्या देशात प्लास्टिक नोटा चलनात

ऑस्ट्रेलियानं सर्वात अगोदर प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरु केला. त्यांच्यानंतर कॅनडा, ब्रिटन, सिंगापूर, मलेशिया, थायलँड, इंडोनेशिया, रोमानिया या देशात प्लास्टिकच्या नोटांचा वापर केला जातो. भारतात अजून प्लास्टिकच्या नोटांचा वापर सुरु झालेला नाही.  भारतात प्लास्टिकच्या नोटा चलनात आणल्या जातात का ते पाहावं लागेल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
रक्षाबंधनला शेतकऱ्यांना खरंच 4000 रुपये मिळणार का? दाव्यामागं नेमकं काय आहे वास्तव, जाणून घ्या सविस्तर माहिती
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget