Russia Ukraine War : जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा परिणाम होत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे आधीच महागामुळे अडचणीत आलेल्या विकसनशील देशांसमोरील अडचणींमध्ये अजून वाढ झाली आहे. या युद्धामुळे विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेसमोरील धोके वाढले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने ( United Nations) याबाबतचा अहवाल जारी केला आहे.
विकसनशील देशात आधीच इंधन आणि अन्नधान्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यातच आता रशिया युक्रेन युद्धामुळे या देशांची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नुकताच याबाबत एक अहवाल जारी केला आहे. गुटेरेस यांनी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गरीब देशांमध्ये अन्न, इंधन आणि आर्थिक संकट जास्त गडद होत आहे. विकसनशील देश आधीच कोरोनासारख्या महामारीमुळे अडचणींचा सामना करत आहेत. त्यातच या देशांना हवामान बदल आणि आर्थिक सुधारणांसाठी निधीच्या कमतरतेला सामोरे जावे लागत आहे.
“ सध्याच्या परिस्थितीमुळे अनेक विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. जगभरातील 1.7 अब्ज लोकांना सध्याच्या परिस्थितीत अन्न, ऊर्जा आणि आर्थिक संकटाचा फटका बसत आहे. या 1.7 अब्ज लोकांपैकी एक तृतीयांश लोक आधीच गरिबीचा सामना करत आहेत.
जगभरातील 107 देशांतील गरीब लोकांना आर्थिक स्थितीचा फटका बसण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि विकासाला चालणा देणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या एजन्सीच्या महासचिव रेबेका ग्रिन्सपॅन यांनी ही माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या