Jaishankar On India Russian Oil US : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे सर्व देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. भारत रशियाकडून तेल आयात करतो. यामुळे रशियातील तेल आयातीवरून अमेरिका भारताला लक्ष करताना दिसत आहे. रशियाकडून तेल खरेदीवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी अमेरिकेत झालेल्या द्वीपक्षीय बैठकीत भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. एस जयशंकर यांनी म्हटलं आहे की, 'भारताऐवजी रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करणाऱ्या युरोपवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. भारत एका महिन्यातही रशियाकडून खरेदी करत नाही तेवढे तेल युरोप रशियाकडून एका दिवसात खरेदी करतो.'


भारत-अमेरिका चर्चेनंतर पत्रकार परिषदेदरम्यान  भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना रशियाकडून भारताच्या तेल खरेदीबद्दल विचारण्यात आले. तेव्हा परराष्ट्र मंत्र्यांनी म्हणाले की, 'भारताच्या रशियाकडून तेल आयातीबद्दल बोलायचे असेल, तर तुम्ही आधी युरोपकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. रशियातून फार कमी प्रमाणात तेल आयात करतो. पण युरोप एका दिवसात जेवढे तेल आयात करतो तेवढं तेल भारत एका महिन्यात खरेदी करत नाही.'






अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यासमोर बोलताना जयशंकर म्हणाले की, 'आम्ही रशिया-युक्रेन संघर्षाच्या विरोधात आहोत. ते म्हणाले, 'आम्ही युद्ध लवकरात लवकर संपवण्याच्या बाजूने आहोत आणि यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. चर्चेने हा प्रश्न सोडवावा अशी आमची इच्छा आहे.'


'भारताकडून कोणत्याही निर्बंधांचं उल्लंघन नाही'
रशियाकडून तेल आयात करण्याच्या भारताच्या हालचालींवर अमेरिकेने केलेल्या विधानाकडे एक मोठा बदल म्हणून पाहिलं जाऊ शकतं. पूर्वी मॉस्कोमधून ऊर्जा आयात वाढवणे भारताच्या हिताचं नसल्याचं म्हटलं होतं. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की हा एक रचनात्मक मुद्दा आहे, मात्र ती एक उत्पादक मुद्दा होता. हे नातं अमेरिका आणि राष्ट्राध्यक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha