Hemangi Kavi : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या विषयांवरील मतं हेमांगी सोशल मीडियावर शेअर करते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची आज (14 एप्रिल) जयंती आहे.  यानिमित्तानं हेमांगीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तिची ही पोस्ट चर्चेत आहे. 


हेमांगीनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले, 'मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!' हेमांगीच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. या पोस्टमध्ये हेमांगीनं #जयभीम #jaybhim #डॉबाबासाहेबआंबेडकर #DrBabasahebAmbedkar #महामानव या हॅशटॅग्सचा देखील वापर केला आहे. 



पेट्रोल दरवाढीवर केलं होतं भाष्य


हेमांगीच्या सोशल मीडियावरील पोस्टला काही नेटकऱ्यांची पसंती मिळते. तर काही युझर्स तिला ट्रोल करतात. काही दिवसांपूर्वी हेमांगीनं पेट्रोल दर वाढीबाबत देखील पोस्ट शेअर केली होती. हेमांगी कवीने पोस्ट शेअर करत लिहिले होते,"या पेट्रोल दरवाढी वर लिंबू फिरवायचा होता मला पण आता…लिंबू वर पेट्रोल फिरवणार आहे!” हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. 


हेमांगीची 'लेक माझी दुर्गा' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच ती 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


हेही वाचा :