American: अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील एका प्राध्यापकाने केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण होताना दिसत आहे. एक मुलाखतीदरम्यान त्यांनी अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांवर निशाणा साधला असून ब्राह्मण महिलांबाबतही आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानावर बहुतांश लोकांनी टीका केली आहे.


भारतीयांविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या या प्राध्यापिकाचे नाव आहे एमी वॅक्स. एमी वॅक्स यांनी 8 एप्रिल रोजी अमेरिकन टीव्ही चॅनल फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या आहेत की, पाश्चिमात्य लोकांविरुद्ध गैर-पाश्चात्य लोकांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांना पाश्चात्य लोकांची लाज वाटते. याचे कारण म्हणजे पाश्चात्य लोक हे त्यांच्यापेक्षा अधिक उत्कृष्ट असून प्रत्येक गोष्टीत त्यांचं अधिक योगदान आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.  


एमी वॅक्स यांनी मुलाखतीदरम्यान आशियाई, दक्षिण आशियाई आणि भारतीय डॉक्टरांवरही टीका केली आहे. एमी वॅक्स यांच्या म्हणण्यानुसार, ''वंशवादाच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत ते पुढाकार घेतात आणि अमेरिकेवर टीका करतात की अमेरिका ही वर्णद्वेषी जागा आहे.'' एमी वॅक्स यांनी ब्राह्मण महिलांवर निशाणा साधत भारतीय महिला अमेरिकेत चांगले शिक्षण घेऊन यश मिळवतात, पण नंतर अमेरिकेवर टीका करतात. तसेच अमेरिकेवर वर्णद्वेषाचा आरोप करतात, असं त्या म्हणाल्या आहेत.  वॅक्स यांच्या मते, "या महिलांना असे शिकवले गेले आहे की, त्या इतरांपेक्षा चांगल्या आहेत. कारण त्या ब्राह्मण उच्चभ्रू (कुटुंबातील) आहेत."






 


महत्वाच्या बातम्या :