नवी दिल्ली : भारताचा परकीय चलन साठ्यात 2.986 अब्ज डॉलरची घट होऊन तो आता 579.285 अब्ज डॉलरवर पोहचला आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने शुक्रवारी यासंबंधी एक आकडेवारी जाहीर केली. या आधी 19 मार्चला परकीय चलन साठ्यात 23.3 कोटी डॉलरची घट होऊन तो 582.271 अब्ज डॉलरवर पोहचला होता. 29 जानेवारीला 590.185 अब्ज डॉलर इतका परकीय चलन साठा होता. 


रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या 26 मार्चच्या आकडेवारीनुसार, देशाच्या foreign currency assets (FCA) मध्ये घट झाल्याने देशाच्या परकीय चलन साठ्यात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. foreign currency assets हा देशाच्या परकीय चलन साठ्याचा एक महत्वाचा भाग असतो. foreign currency assets हे डॉलरच्या तुलनेत मोजले जाते पण त्यात यूरो, पाऊंड, येन सारख्या इतर परकीय चलनाचा समावेशही असतो. 


देशाच्या परकीय चलन साठ्याला FOREX किंवा Foreign Reserve Exchange असंही म्हटलं जातंय. हा साठा परकीय चलनाच्या रुपात साठवला जातोय जेणेकरुन ही रक्कम आवश्यक त्यावेळी वापरता येईल. सध्या भारताचा परकीय चलन साठा हा डॉलरच्या स्वरुपात साठवला ठेवला जातोय कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर हे सर्वाधिक वापरलं जाणारं आणि विश्वासू चलन आहे. ज्या देशाचा परकीय चलन साठा जास्त त्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक कुवत जास्त असं मानलं जातंय. याचा वापर आंतरराष्ट्रीय व्यापारात होतो. ज्या देशाकडे परकीय चलन साठा जास्त त्याची आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्ये पत जास्त असं काहीसं गणित आहे. 


जगातील सर्वाधिक परकीय चलन साठा असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा पाचवा क्रमांक लागतोय. चीन आणि अमेरिका हे देश परकीय चलनसाठ्याच्या बाबतीत अग्रेसर आहेत. 


महत्वाच्या बातम्या :