Assembly Elections 2021 : बंगाल आणि आसामच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मतदान पार पाडल्यानंतर एका बोलेरो गाडीमध्ये ईवीएम मशीन सापडले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ईवीएम मशीन घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने  चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात केले आहे. 


या घटनेनंतर निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. जप्त केलेले ईवीएम मशीन सीलबंद होते. तरीही LAC  1 रतबाडी (SC) इंदिर एम.वी स्कूलमध्ये पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.


संध्याकाळी 6 वाजता मतदान संपल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसह ईवीएम मशीनसह अधिकारी मतदानस्थळाहून निघाले होते.  पाथकरकंडीचे विद्यमान आमदार आणि सध्याच्या निवडणुकीतील भाजपा उमेदवार कृष्णेंदू पॉल यांची ही कार आहे.  निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं कळालं, असं आयोगाने सांगितलं.


घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. प्रत्येकवेळी निवडणुकीच्या काळात ईव्हीएम मशीनची खासगी सापडल्यानंतर अनेक गोष्टी सारख्याच असतात. पहिलं म्हणजे गाडी भाजपा उमेदवारांची वा त्यांच्या सहकाऱ्यांची असते. निवडणूक आयोगाने तक्रारींवर कारवाई करण्याची तसेच सर्व पक्षाकडून ईव्हीएम मशीनची पुर्नतपासणी करणे आवश्यक आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.


काय आहे ओपिनियन पोलचा अंदाज 


पश्चिम बंगालमध्ये 2016 मध्ये टीएमसीला 44.9 टक्के मते मिळाली होती, असा अंदाज वर्तविला जात आहे की यावेळी ही मते दीड टक्क्यांनी कमी होऊन 43.4 टक्के होऊ शकतात. याचा फायदा भाजपला होताना दिसून येत आहे. मागील वेळी 10.2 टक्के मते मिळाली होती, ती यावेळी वाढून 38.4 टक्के होण्याचा अंदाज आहे, म्हणजेच 28.2 टक्के फायदा होत आहे. तर सर्वात जास्त नुकसान काँग्रेस आणि डाव्या आघाडीला होताना दिसत आहे. मागील वेळी त्यांना 37.9 टक्के मते मिळाली होती, यावेळी केवळ 12.7 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. म्हणजे उणे 25.2 टक्के नुकसान होणार आहे. गेल्या वेळी इतरांना 7 टक्के मते मिळाली होती, तर यावेळी साडेपाच टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे, म्हणजे दीड टक्के कमी झाली आहेत.