Pune Mini Lockdown: कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेत पुण्यात आजपासून मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आजपासून पुढील सात दिवस हा मिनी लॉकडाऊन असणार आहे. सात दिवस सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, शाळा, कॉलेजेस, पीएमपीएमएलची बससेवा इत्यादी गोष्टी पूर्णपणे बंद असतील. कोरोना संकट कमी व्हावं या उद्देशाने हा मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे या लॉकडाऊनला लोकांचा प्रतिसाद देखील तितकच महत्वाचं आहे. 


काय सुरु काय बंद?



  • पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएमएलची बससेवा पुढील सात दिवसांसाठी बंद

  • मात्र कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी खाजगी वाहनांचा उपयोग करु शकतील. 

  • दिवसा पुण्यात जमावबंदी असेल.

  • लग्न समारंभ आणि अंत्यविधी सोडून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी 

  • मायक्रो कंटेंटमेंट झोनमधे नियमांची आणखी कडक अंमलबजावणी

  • पुण्यातील वाईन शॉप संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहतील. बार, रेस्टॉरंट बंद  राहणार असली तरी वाईन शॉप सुरू राहतील.

  • संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार बंदी असली तरी अन्नाची होम डिलीव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.


Maharashtra Corona Cases: राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर! आज तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ


पुढच्या शुक्रवारी पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असं विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं. मागील आठवड्यात पुण्यात पॉझिटीव्हीटी रेट 32 टक्के होता.  गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात दररोज जवळपास आठ हजार रुग्ण आढळून आले.  परिस्थिती अशीच राहिली तर येत्या आठवड्यात दररोज नऊ हजार रुग्ण आढळून येतील. काल  आर्मी आणि खाजगी हॉस्पिटलच्या प्रशासनासोबत बैठक झाली आणि बेड वाढवण्याचा निर्णय झाला आहे. काही हॉस्पिटल्स 100 टक्के कोव्हिड साठी वापरण्याची वेळ येऊ शकते. 


राज्यात काल 47827 रुग्णांची नोंद 


राज्यात काल तब्बल 47 हजार 827 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. दरम्यान, राज्यात परिस्थिती आणखी बिघडली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. काल नवीन 24 हजार 126 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2457494 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 389832 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.62% झाले आहे.


तर लॉकडाऊन अटळ आहे : मुख्यमंत्री 
आपण मधल्या काळात गाफील झालो. आता कोरोनाशी लढताना आपण परिस्थितीत पाय घट्ट रोवून उभे राहुया. विरोधकांना विनंती करतो, की जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण मी इशारा देत आहे. दृश्य स्वरुपातीव परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय लवकरच घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र राज्य सरकार हे खंबीर आहे. आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू देणार नाही. सर्वांच्या सहकार्याचीच मी अपेक्षा करतो. सणांवरही निर्बंध आणावे लागतील. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत कोरोनाविरोधातील लढाई लढण्यासाठी सिद्ध व्हा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देत राज्यात कठोर निर्बंध लागणार असा इशारा दिला आहे.