Hop-Shoots Cultivation : भारतात सध्या प्रगतीशील शेती करण्याकडे अनेक तरुणांचा कल वाढत चालला आहे. त्यात फळ, फुले आणि भाज्यांच्या शेती करणे आणि त्याचा निर्यात करणे यामुळे या तरुणांना अमाफ नफा मिळत आहे. असाच काही वेगळा प्रयोग बिहारच्या एका तरुणाने केला आहे. त्याने हॉप शूट्स नावाची एक भाजी लावली आहे, जी जगातली सर्वात महागडी भाजी म्हणून ओळखली जाते. या भाजीचा एका किलोचा भाव आहे तब्बल एक लाख रुपये. या भाजीच्या उत्पादनातून या तरुण शेतकऱ्याने कोट्यवधी रुपये कमावले आहेत. 


बिहारच्या औरंगाबादचा रहिवासी असलेल्या अमरेस सिंग या तरुणाने हॉप शूट नावाच्या भाजीचे यशस्वी उत्पादन घेतलं आहे. सुरुवातीला त्याने भारतीय भाजी संशोधन केंद्राच्या मदतीने पाच गुंठ्यात या भाजीच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. या भाजीचे फायदे अनेक आहेत. या भाजीचा उपयोग अँटिबायोटिक्स, टीबी आणि कर्करोग या सारख्या रोगांवरील औषध अॅक्टिव्ह फार्मा इनग्रेडिएन्ट्स बनवण्यास होतो. याच्या फुलाला हॉप कोन्स असं म्हटलं जातं. 


महत्वाचं म्हणजे वर्षभर या भाजीचे उत्पादन घेता येऊ शकतं. पण मार्च ते जून हा कालावधी सर्वाधिक चांगला मानला जातोय. जास्त थंड असेल तर या भाजीच्या उत्पादनावर परिणाम होतो. या भाजीच्या उत्पादनासाठी चांगली करदार जमीन आवश्यक आहे.


युरोपात आठव्या शतकापासून या भाजीला बीयरमध्ये टाकून याचं सेवन केलं जातं. या भाजीची शेती सर्वप्रथम जर्मनीमध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर युरोपातील इतर देशात आणि आता जगभर याचा प्रसार झाला आहे. आता बिहारच्या माध्यमातून या शेतीची सुरुवात भारतात झाल्याचं पहायला मिळतंय. भारतीय शेतकऱ्यांना याच्या शेतीचे प्रशिक्षण दिल्यास तसेच या भाजीचे रोपे उपलब्ध करुन दिल्यास भारतातीय शेतीत हरित क्रांती जन्माला येऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. या भाजीला जगभरातून मोठी मागणी आहे.


हॉप शूट या भाजीचे सायन्टिफिक नाव हे ह्यूमुलस ल्यूपुलस (humulus lupulus) असं आहे. या भाजीला सर्वाधिक मागणी ही अमेरिकेतून आहे. तसेच युरोपीयन देशातही याची मागणी मोठी आहे.  


आयएएस अधिकारी असलेल्या सुप्रिया साहू यांनी आपल्या सोशल मीडियावर या भाजीच्या शेतीची बातमी शेअर केली असून त्यात त्यांनी सांगितलंय की अशा प्रकारची शेती ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक गेम चेन्जर ठरु शकते. 





महत्वाच्या बातम्या :