मुंबई : भारत आणि चीन यांच्यातील सीमावादानंतर सरकारने अनेक चीनी अॅप्सवर बंदी घातली. त्यामध्ये TikTok या लोकप्रिय अॅपचाही समावेश होता. अशातच टिकटॉकमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी गुंतवणूक करण्याच्या विचार करत आहेत. एका रिपोर्टमधून असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, असं सांगण्यात येत आहे की, टिकटॉक आणि जियो यांच्यातील ही बोलणी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असून रिलायन्स ग्रुप सध्या गुंतवणूकीच्या शक्यतांवर विचार करत आहे.


भारतात टिकटॉक बॅन केल्यानंतर ByteDance च्या मालकीची कंपनी असलेल्या टिकटॉकला मोठ्या प्रमाणावर नुकसानाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, सध्या गुंतवणूकीबाबत रिलायन्स आणि बाईटडान्स यांच्याकडून कोणत्याही प्रकराची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


भारत सरकारचा चीनला दणका; टिकटॉक, यूसी ब्राऊजरसह 59 अॅप्स बॅन


भारतात टिकटॉकवर बंदी


गलवाल खोऱ्यात चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेनंतर भारतात 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारताने या निर्णयासाठी सार्वभौमत्व, सुरक्षा आणि गोपनीयता ही कारणं देत चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. दरम्यान, टिकटॉक चिनी सरकारसोबत युजर्सचा डाटा शेअर करत असल्याचा आरोप भारता व्यतिरिक्त इतरही अनेक देशांनी लावला आहे.


टिकटॉक व्यतिरिक्त यूसी ब्राउझर, शेअर इट, हॅलो, लाइक, कॅम स्कॅनर, शीन यांसारखे अॅप्सही भारत सरकारने बॅन केले होते. बायडू मॅप, केवाई, डीयू बॅटरी स्कॅनर हे अॅपही बॅन झाले आहेत. दरम्यान, सरकारने या चिनी अॅप्सवर आयटी अॅक्ट 2000 अंतर्गत बंदी घातली होती.


टिकटॉक खरेदी करण्याबाबत मायक्रोसॉफ्टनंतर ट्विटरही शर्यतीत


भारतात TikTok (टिकटॉक) बंद झाल्यानंतर अमेरिकेनेही चीनच्या अॅपवर बंदी आणली आहे. या दरम्यान अमेरिकेची मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट टिकटॉक खरेदी करणार होती. याबाबत चर्चाही सुरु होती. मात्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर बंदी आदेश जारी करताच टिकटॉकने आता रिलायन्सवर दोरे टाकायला सुरुवात केली आहे. तसेच या शर्यतीत ट्विटरही असल्याचं सांगण्यात येत आहे. डो-जोंसच्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, टिकटॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी यांच्यात बोलणी सुरु आहेत. परंतु, हा करार पूर्ण झाला की, नाही याबाबत अद्याप कोणतीच माहिती उपलब्ध नाही.


महत्त्वाच्या बातम्या : 


RBI | एप्रिलच्या तुलनेत अर्थव्यवस्था सुधारतेय, रेपो रेटमध्ये बदल नाही : शक्तिकांत दास


अमेरिकी कंपनी ‘सिल्वर लेक’ची जिओमध्ये 5,656 कोटींची गुंतवणूक


डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला झटका; टिकटॉक, वीचॅटवर बंदी घालणारा आदेश जारी