एक्स्प्लोर

RBI Tokenisation Rule :  क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांसाठी मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून बदलणार पेमेंटचे नियम

RBI Tokenisation Rule : 1 ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, हा नियम लागू झाल्यानंतर कार्डधारकांना अधिक सुविधा मिळेल. 

RBI Tokenisation Rule : देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे. 1 ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, हा नियम लागू झाल्यानंतर कार्डधारकांना अधिक सुविधा मिळेल. 

या पूर्वी हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होता, पण RBI ने ही मुदत सहा महिन्यांसाठी वाढवून 30 जून केली होती. नंतर आरबीआयने आपली अंतिम मुदत पुन्हा 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवली. म्हणजेच टोकनायझेशन सुविधा पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होणार आहे. आरबीआयने सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा ऑनलाइन, पॉइंट-ऑफ-सेल आणि अॅप-मधील व्यवहार एकामध्ये एकत्र करून एक टोकन जारी करणार अलल्याचे सांगितले आहे. 

टोकनायझेशन म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा व्यवहार 16-अंकी कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीव्हीव्ही आणि ओटीपी नमूद करावा लागतो. जेव्हा ही सर्व माहिती योग्यरित्या भरली जाते तेव्हाच व्यवहार यशस्वी होतो. टोकनायझेशन कार्ड तपशील "टोकन" नावाच्या पर्यायी कोडमध्ये रूपांतरित करेल. हे टोकन कार्ड, टोकन विनंतीसाठी आणि डिव्हाइसवर अवलंबून असेल. 

कार्ड टोकनायझेशन सुरक्षित आहे का?
जेव्हा कार्ड तपशील एन्क्रिप्टेड पद्धतीने संग्रहित केले जातात तेव्हा फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमचे डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती टोकन स्वरूपात शेअर करता तेव्हा तुमचा धोका कमी होतो. 

16-अंकी डेबिट, क्रेडिट कार्ड क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज नाही
रिझव्‍‌र्ह बँकेने टोकन प्रणाली अंतर्गत प्रत्येक व्यवहारासाठी कार्ड तपशील इनपूट करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. डिजिटल पेमेंट अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न सुरूच राहतील.

टोकनायझेशन कसे कार्य करेल?
या व्यवस्थेमध्ये तुमची कार्ड माहिती एका पर्यायी कोडमध्ये रूपांतरित केली जाईल. या कोडच्या मदतीने पेमेंट करणे शक्य होईल.या प्रक्रियेत तुम्हाला तुमच्या कार्डचा CVV नंबर आणि वन टाईम पासवर्ड देखील आवश्यक असेल. याशिवाय अतिरिक्त पडताळणीसाठीही संमती द्यावी लागेल. 

डिजिटल पेमेंट दरम्यान तुम्हाला टोकन क्रमांक निवडण्याचा पर्याय दिला जाईल.यावर क्लिक केल्यावर संबंधित कार्ड माहिती टोकन नंबरमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. विनंती तुमच्या संमतीने पाठवली जाईल. यानंतर तुम्हाला कार्ड नंबरऐवजी टोकन नंबर दिला जाईल. याच्या मदतीने तुम्ही पैसे भरू शकाल. विशेष बाब म्हणजे वेगवेगळ्या वेबसाइट्ससाठी एकाच कार्डसाठी वेगवेगळे टोकन क्रमांक दिले जातील.

महत्त्वाच्या बातम्या

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
कमी पगारातून सुरुवात, आज 75 लाखांची संपत्ती, 26 वर्षाच्या तरुणाची आदर्शवत कामगिरी, नेमकं कसं केलं नियोजन?  
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget