एक्स्प्लोर

Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   

RBI नव्या नियमांमुळं कर्ज मुदतीपूर्वी बंद करणं सोपं होणार आहे. पुढील काळात क्रेडिट स्कोअर अपडेट प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार आहे. 

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयनं  2025 पासून टप्प्याटप्प्यानं अनेक नियम लागू केले आहेत. आरबीआयकडून सर्व नियम एकाच वेळी लागू न करता टप्प्याटप्यानं लागू केले आहेत. नोव्हेंबर 2025 पासून नियम लागू करण्यास सुरुवात करण्यात आली असून या नियमांची अंमलबजावणी जुलै 2026 टप्प्या टप्प्यानं लागू केले जाणार आहेत. नव्यानं लागू होणाऱ्या नियमांनुसार कर्ज परतफेड मुदतीअगोदर करण्यावरील शुल्क, क्रेडिट स्कोअर अपडेट होणे, बँक खात्यामधील वारसदारांची नावं यात बदल होणार आहे. 

क्रेडिट स्कोअर अपडेट

क्रेडिट स्कोअर संदर्भातील नियमात देखील बदल झाला आहे. आता प्रत्येक कर्जदाता दर आठवड्याला क्रेडिट रिपोर्ट जारी करेल. ही सुविधा 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे. यापूर्वी क्रेडिट स्कोअर अपडेट होण्यास वेळ लागत होता. सर्वसाधारणपणे एका महिन्यात एकदा क्रेडिट स्कोअर अपडेट केला जात होता.  आता तुम्ही कर्जाचा हप्ता भरल्यानंतर तुमचा क्रेडिट स्कोअर अपडेट हईल.  जर, कर्जाचा हप्ता भरण्यास उशीर झाला  तर त्याची देखील नोंद लगेचच होईल. ज्यांना क्रेडिट स्कोअर सुधारायचा असेल त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. मात्र, कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचं पेमेंट करण्यास उशीर केल्यास त्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर दिसून येईल.

कर्जाच्या प्रीपेमेंटवर शुल्क लागणार नाही

रिटेल कर्जदारांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे बदलत्या व्याज दरावरील कर्ज खातं मुदतीपूर्वी बंद केल्यास म्हणजेच फोर क्लोजर केल्यास आकारलं जाणारं शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे.  हा नियम 1 जानेवारी  2026 नंतर मंजूर झालेल्या कर्जांवर किंवा कर्ज नुतनीकरणावर लागू असेल. यात गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आणि शिक्षण कर्जाचा समावेश असेल.  जर तुम्हाला कर्ज खातं वेळेपूर्वी बंद करायचं असेल तर तुम्हाला कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही. यामुळं कर्जाचं नियोजन यापूर्वी पेक्षा सोपं होईल. 

जेव्हा तुमचं उत्पन्न वाढेल किंवा कॅश फ्लो चांगला असेल तर तुम्ही सहजपणे कर्जाची परतफेड करु शकता. बोनस किंवा अचानक मिळालेल्या पैशांचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरू शकता. 

बँक खाते वारसदार संख्या

आरबीआयनं 1 नोव्हेंबर 2025 पासून बँक खाते आणि लॉकरसाठी वारसदारांची संख्या वाढवून 4 केली आहे. ठेव खात्यात वारसदार एकावेळी किंवा क्रमानं जोडता येतील. तर, लॉकरसाठी वारसदारांची नोंद एका क्रमानंतर एक अशी करता य येईल. 

गोल्ड लोन संदर्भात ज्वेलर्सला दिलासा 

सराफा व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. गोल्ड लोन परतफेडीचा कालावधी 180 दिवसांऐवजी 270 दिवस करण्यात आला आहे. हा नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. यामुळं ज्वेलर्सला कॅश फ्लो सांभाळण्यात मदत होईल. यामुळं वारंवार कर्जाचं नुतनीकरण करणं कमी होईल. 

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget