RBI : दीर्घकाळ निष्क्रिय किंवा व्यवहार न झालेले बँक खाते याला इन-ऑपरेटिव्ह अकाऊंट म्हणतात. अकाऊंट मध्ये दोन वर्षांहून अधिक काळ व्यवहार न झाल्यास ते इन-ऑपरेटिव्ह होते. या वेळी, खातेदार खात्यात कोणताही व्यवहार करू शकत नाही. इन-ऑपरेटिव्ह खाते पुन्हा कसे सक्रिय करायचे? भारतीय रिझर्व्ह बॅंकने याबाबत माहिती दिली आहे. जाणून घ्या


अकाउंट सर्च


खातेधारक आपले खाते निष्क्रिय झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी बँकेच्या वेबसाइटवर शोधू शकतात. बँकांना त्यांच्या वेबसाइटवर सर्व इन-ऑपरेटिव्ह खात्यांचा डेटाबेस ठेवणे आवश्यक आहे.


अ‍ॅप


इन-ऑपरेटिव्ह खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी, शाखा व्यवस्थापकाकडे लेखी अर्ज सादर करावा लागेल. यामध्ये हे सांगावे लागेल की, यामुळे खाते बऱ्याच काळापासून चालवले जात नाही. अर्जावर खात्याच्या सर्व संयुक्त धारकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.


केवायसी डॉक्युमेंटेशन


इन-ऑपरेटिव्ह खाते पुन्हा सक्रिय करण्याच्या विनंतीसह, नवीन केवायसी दस्तऐवज देखील सबमिट केले जातील. यामध्ये छायाचित्र, पॅन, पत्ता आणि ओळखीचा पुरावा यांचा समावेश आहे.


व्यवहार (Transaction)


खाते सक्रिय करण्यासाठी खातेदाराला काही रक्कम खात्यात टाकावी लागते.


शुल्क


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इन-ऑपरेटिव्ह खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी बँका कोणतेही शुल्क आकारू शकत नाहीत.



काळजी घ्या


मुदत ठेवीवरील व्याज नियमितपणे बचत खात्यात जमा होत असल्यास, खाते चालू होत नाही. तुम्ही खाते वापरणे सुरू ठेवू इच्छित नसल्यास, ते बंद करणे चांगले. बचत खात्यावर व्याज जमा केले जाते आणि खाते चालू किंवा सक्रिय आहे की नाही हे महत्त्वाचे नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या: