Nupur Sharma Row: अजमेरमधील ख्वाजा गरीब नवाज दर्गाचे खादिम सलमान चिश्तीला अजमेर पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटक केली आहे. सलमान चिश्ती यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सलमान चिश्ती याने नुपूर शर्मा विरोधात पोस्ट केली होती. पोलिसांनी सांगितले की, सलमानविरोधात 13 गु्न्हे दाखल आहेत.
आरोपी सलमान चिश्ती याने नुपूर शर्मा यांची हत्या करणाऱ्याला बक्षिस जाहीर केले होते. नुपूर यांची हत्या करणाऱ्याला घर देणार असल्याचे त्याने म्हटले होते. या व्हिडिओत तो हत्येची चिथावणी देताना तो नशेत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी सलमान चिश्तीची कसून चौकशी सुरू केली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी दिली. सलमान चिश्तीविरोधात 13 गुन्हे दाखल असल्याचेही त्यांनी सांगितले. अजमेर पोलिसांनी चिश्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांनी तपासासाठी तीन पथके तयार केली आहेत. चिश्तीच्या घरासह त्याच्याशी संबंधित इतर ठिकाणांवर छापेमारी केली आहे.
सोमवारी सोशल मीडियावर धमकी देणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने पावले उचलत सलमान चिश्तीला अटक केली. सलमान चिश्तीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.
अजमेर ख्वाजा गरीब नवाज दर्गामध्ये आरोपी सलमान काम करत होता. सोशल मीडियावर चिथावणीखोर आणि वादग्रस्त पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडवल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली.