Aadhaar Card Validity: सध्याच्या काळात शासकीय योजना आणि शासकीय कामांसाठी आधार कार्ड ओळखपत्र म्हणून सादर करावे लागते. आधार कार्ड हे भारतात अतिशय महत्त्वाचे दस्ताऐवज झाले आहे. आधार कार्ड UIDAI च्यावतीने दिले जाते. शाळेत प्रवेशासह आयकर परतावा दाखल करण्यासह अनेक गोष्टींसाठी आधार कार्डची आवश्यकता असते. आधार क्रमांक हा भारतीय नागरिकाचा 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक आहे.
आधार कार्ड हे इतर ओळख पत्रापेक्षाही वेगळे आहे. आधारमध्ये बायोमेट्रिक माहिती जमा केली जाते. वाहन चालक परवाना, पासपोर्ट आदींच्या वैधतेची एक कालमर्यादा निश्चित असते. त्यामुळे आधारबाबतही त्याची वैधता किती वर्ष असते, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात.
आधार कार्डची वैधता किती वर्ष?
आधार कार्डमध्ये आपले नाव, वय , राहण्याचा पत्ता आदी माहिती असते. त्याशिवाय, प्रत्येक नागरिकाची एक बायोमेट्रिक माहितीदेखील असते. बँक खाते आणि ओळखीचा पुरावा म्हणून आधार लिंक केले जाते. त्यामुळे आधार कार्डची वैधता किती वर्ष असते, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. संबंधित व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत आधार कार्ड वैध असते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तुम्ही हे कार्ड ब्लॉक करू शकता. मात्र, त्याचे आधार कार्ड सरेंडर करू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात त्यासाठी फक्त एकदाच आधार कार्ड जारी केले जाते.
ब्लू आधार कार्डची वैधता
पाच वर्षाखालील मुलांसाठी UIDAI ब्लू आधार कार्ड जारी करते. या कार्डमध्ये सर्व माहिती नमूद केली जाते. यामध्ये बायोमॅट्रिक माहिती दाखल केलेली नसते. पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर मुलांची बायोमॅट्रिक माहिती नमूद केली जाते. त्यानंतर हे आधार कार्ड नियमित आधार कार्ड होते.
>> आधार कार्डची वैधता अशी तपासा
> आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जा
> त्यानंतर Aadhaar Services या पर्यायावर क्लिक करा
> Verify Aadhaar Number पर्यायावर क्लिक करा
> त्यानंतर एक पेज ओपन होईल, त्याठिकाणी 12 अंकी क्रमांक नमूद करा
> Security Code नमूद करा
> त्यानंतर Verify पर्यायावर क्लिक करा
> जर तुमचा आधार क्रमांक वैध असेल तर आधार क्रमांक दिसून येईल. जर वैध नसेल तर तुम्हाला हिरव्या रंगाचे चिन्ह दिसेल.