RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  आरबीआयने ज्या तीन बँकांवर कारवाई केली, त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश आहे. 


आरबीआयने कारवाई केलेल्या बँकांमध्ये मुंबईतील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (The Maharashtra State Co-operative Bank), बेतियामधील नॅशनल सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (The National Central Cooperative Bank Limited)  आणि नाशिकमधील 'द नाशिक मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँक' (The Nasik Merchant's Co-operative Bank ) यांचा समावेश आहे.  


RBI ने महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेला 'फसवणूक - वर्गीकरण, अहवाल आणि देखरेखीसाठी मार्गदर्शक तत्त्वे याबाबत नाबार्डने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 37.50 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. 


तर, नॅशनल सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडनेही नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले. या सहकारी बँकेने केवायसी नियमांकडे दुर्लक्ष केले असल्याचे आरबीआयच्या निदर्शनास आले. त्यानंतर आरबीआयने बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला. 'द नाशिक मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँके'ने इतर बँकांसोबत केलेल्या व्यवहाराची माहिती दिली नसल्याचे आरबीआयला आढळून आले.


ग्राहकांवर काय परिणाम?


आरबीआयने केलेल्या या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांच्या सेवांवर अथवा त्यांच्याद्वारे होणाऱ्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँकेने या सहकारी बँकांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. बँकांचे व्यवहारही सुरळीत सुरू असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: