Small Saving Schemes News : एनएससी (NSC), पीपीएफ(PPF) , पोस्टामधील गुंतवणूक (Post Office Saving Schemes) आणि सुकन्या समृद्धी योजनासारख्या( Sukanya Samridhi Yojna) छोट्या सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना झटका बसलाय. कारण, छोट्या सरकारी योजनांवरील व्याजदरात सरकारकडून कोणताही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ आणि सरकारी रोख्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यानंतरी छोट्या सरकारी योजनांच्या व्याजदरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी याबाबतची घोषणा केली आहे. एक एप्रिल 2022 ते एक जून 2022 पर्यंत छोट्या बचत योजनांवर असणारा व्याजदरच लागू असेल, असे अर्थ मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
वाढती महागाई, व्याज दरात वाढ आणि एक वर्षात सरकारी बाँड वरील उत्पन्नामध्ये (Government Bond Yield) मोठी वाढ झाली आहे. अशात छोट्या सरकारी बचत योजनांच्या व्याजदरात मोठी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. छोट्या सरकारी बचत योजनांवरील व्याज दर सरकारच्या बाँड यील्डपेक्षा 25 ते 100 बेसिस प्वाईंटपेक्षा जास्त असावा, असे 2011 मध्ये गोपीनाथ कमिटीद्वारे असा सल्ला देण्या आला होता. पण अर्थ मंत्रालयाकडून 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सध्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) यावर 7.1 एक टक्के वार्षिक व्याज मिळते. NSC म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 6.8 टक्के वार्षिक व्याज मिळतेय. तर सुकन्या समृद्धी योजनावर (Sukanya Samridhi Yojna) 7.6 टक्के आणि सीनिअर सिटीजन सेविंग स्कीमवर ( Senior Citizen Saving Scvheme) 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळतेय. किसान विकास पत्र ( Kisan Vikas Patra) वर 6.9 टक्के वार्षिक व्याज मिळतेय. एक वर्षाच्या मुदत ठेवीवर 5.5 टक्के व्याज मिळतेय. तर एक ते पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर 5.5 ते 6.7 पर्यंत व्याज मिळते. 2020-21 च्या पहिल्या तिमाहीपासून छोट्या बचत योजानांवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.