एक्स्प्लोर

RBI : रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 13 लाखांचा दंड, राज्यातील आणखी एका बँकेला ठोठवला दंड 

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 13.30 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. 

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील बँका, फायनान्स कंपन्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जातं. बँकांच्या कामकाजात काही त्रुटी आढळून आल्यास कारवाई केली जाते. आरबीआयनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार राज्यातील दोन बँकांना आर्थिक दंड करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मनमाड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मनमाड  या दोन बँकांना आर्थिक दंड करण्यात आला आहे. याशिवाय द युनाएटेड पुरी निमपारा सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ओडिशाला देखील आर्थिक दंड करण्यात आला आहे. 

कोल्हापूर जिल्हा बँकेला 13.30 लाखांचा दंड 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 17 जुलै रोजी जारी केलेल्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला 13.30 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.  बँकिंग नियमन कायदा 1949 च्या सेक्शन 20(1) आणि सेक्शन 56 संदर्भातील तरतुदींची पूर्तता न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे,असं आरबीआयनं म्हटलं. बँकिंग नियमन कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत ही आर्थिक दंडात्मक कारवाई केल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे. 

नाबार्डकडून 31 मार्च 2025 च्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीचं इन्सपेक्शन करण्यात आलं होतं. त्यावेळी काही नियमांची पूर्तता न केल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर बँकेला नोटीस देत आर्थिक दंड का करु नये असं विचारण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या उत्तरानंतर आरबीआयनं दंडात्मक कारवाई केली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं संचालकांशी संबंधित कर्ज मंजूर केल्याचं निरीक्षण आरबीआयनं नोंदवलं असून दंडात्मक कारवाई केली आहे. 

मनमाडमधील बँकेला 1 लाखांचा दंड

आरबीआयनं 17 जुलैच्या आदेशानं मनमाड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मनमाडला 1 लाख रुपयांचा दंड केलेला आहे. या बँकेनं बँकिंग नियमन कायद्यानुसार संचालकांना, त्यांच्या नातेवाईकांना कर्ज देण्यासंदर्भातील नियमांची पूर्तता न केल्यानं दंड करण्यात आला आहे. या बँकेनं संचालकांच्या नातेवाईकांना कर्ज मंजूर केल्याचं निदर्शनास आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. 

दरम्यान,  द युनाएटेड पुरी निमपारा सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, ओडिशा या बँकेला केवायसी संदर्भातील नियमांची पूर्तता न केल्यानं 3 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. बँकेला आरबीआयनं दिलेल्या वेळेत खातेदारांचं केवायसी रेकॉर्ड सेंट्रल केवायसी रेकॉर्डस रजिस्ट्रीमध्ये अपलोड करण्यात अपयश आलं आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget