मुंबई : भांडवली बाजारात (Share Market) अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांची फारशी चर्चा नसते. मात्र याच कंपन्या गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. सध्या अशाच रामा स्टील ट्यूब्स (Rama Steel Tubes) या कंपनीची सगळीकडे चर्चा होत आहे. या कंपनीच्या समभागाचे मूल्य चार वर्षांपूर्वी 28 पैसे होते. आता मात्र याच समभागाचे मूल्य थेट 12 रुपये झाले आहे. म्हणजेच गेल्या चार वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 4400 टक्के रिटर्न्स दिले आहेत.  


चार वर्षांत कंपनीच्या शेअरचे मूल्य 28 पैसे


रामा स्टील ट्यूब्स ही कंपनी स्मॉलकॅप श्रेणीत मोडते. या कंपनीने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना छप्परतोड रिटर्न्स दिले आहेत. वर सांगितल्याप्रमाणे चार वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 28 पैसे होते. आता हेच मूल्य थेट 12 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 4400 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तीन वेळा एकूण 10 बोनस शेअर दिलेले आहेत.    


...तर भेटले असते 45 लाख रुपये


रामा स्टील ट्यूब्स (Rama Steel Tubes) या कंपनीने उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे. या कंपनीच्या शेअर मूल्य 3 एप्रिल 2020 रोजी 28 पैसे होते. आज 10 एप्रिल 2024 रोजी हा शेअर 12.83  रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आकडेवारीत सांगायचं झालं तर रामा स्टील ट्यूब्सने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना 4485 टक्के रिटर्न्स दिलेले आहेत. याचा अंदाज लावायचा असेल तर एक उदाहरण बघूया. समजा तुम्ही 3 एप्रिल 2020 रोजी रामा स्टील ट्यूब्स या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते तर सध्याच्या मूल्यानुसार या पैशांचे 45.82 लाख रुपये झाले असते. विशेष म्हणजे यामध्ये कंपनीने दिलेल्या बोनस शेयर आणि स्टॉक स्प्लिट्सचा समावेश करण्यात आलेला नाही. 


आतापर्यंत गुंतवणूकदारांना दिले 10 बोनस शेअर


या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत तीन वेळा एकूण 10 बोनस शेअर दिले आहेत. सर्वांत अगोदर कंपनीने 2016 रोजी 4:1 अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येकी एका शेअरवर 4 बोनस शेअर दिले आहेत. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये 4:1 म्हणजेच प्रत्येक एका शेअरवर 4 बोनस शेअर दिले होते. मार्च 2014 मध्येही या कंपनीने आपल्या ग्राहकांना 2:1 अशा रेशोमध्ये बोनस शेअर दिले होते. म्हणजेच कंपनीने मार्च 2014 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक एका शेअरमागे 2 बोनस शेअर दिले होते. रामा स्टील ट्यूब्स या कंपनीने आतापर्यंत दोन वेळा आपले स्टॉक स्प्लिट केले आहेत. मार्च 2016 मध्ये या कंपनीने 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरला 5 रुपये फेस व्हॅल्यू शेअरमध्ये स्प्लिट केले होते.


हेही वाचा : 


आधी 12 आता थेट 214 रुपये! 'या' कंपनीच्या शेअरची कमाल, पैसे गुंतवल्यास व्हाल मालामाल!


'या' कंपनीचं एक पाऊल पुढे! लवकरच येणार 10 हजार कोटींचा IPO, खोऱ्याने पैसे ओढण्याची संधी!


घरात पाळीव प्राणी असल्यास मिळणार भरघोस सुट्ट्या, आता कर्मचाऱ्यांची मज्जाच मज्जा!