Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : केंद्र सरकार (central Govt) विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देत असते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी या हेतूने सरकार शेतकऱ्यांना मदत करत असते. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi). या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. ही मदत शेतकऱ्यांनी हप्त्यात दिली जाते. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हप्ते जमा झाले आहेत. 17 वा हप्ता कधी मिळणार याची अपेक्षा आहे. दरम्यान, तुम्हाला जर 17 वा हप्ता हवा असेल तर काही महत्वाची काम आत्ताच तुम्हाला करावी लागतील अन्यथा 17 वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. 


शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी?


सरकारनं आत्तापर्यंत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. लवकरच 17 वा हप्ता देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान,शेतकऱ्यांना 17 वा हप्ता मिळण्यापूर्वी जमिनीची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्यासंदर्भातील कागदपत्रे अपडेट करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला 17 वा हप्ता मिळणार नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी देखील केली नाही. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करणं गरेजचं आहे. अन्यथा त्यांचा 17 वा हप्ता मिळणार नाही. तसेच तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी अर्ज भरताना काही चूक केली असेल, म्हणजे नाव, किंवा चुकीचे लिंग, आधार कार्ड क्रमांक अशा काही चुका केल्या असतील तर तुमच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जमा होणार नाही. याची काळजी सर्व शेतकऱ्यांनी घ्यावी. 


2019 मध्ये मोदी सरकारनं ही योजना सुरु केली 


सरकारनं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली. 2019 मध्ये मोदी सरकारनं ही योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. प्रत्येकी चार महिन्याला लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जातात. दरम्यान, याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं देखील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


55 रुपये जमा करा, 3000 रुपये मिळवा; शेतकऱ्यांसाठी खास आहे 'ही' योजना