PM Kisan Mandhan Yojana: सर्वसामान्यांसाठी गरिब लोकांसाठी सरकार (Govt) सातत्यानं विविध योजना राबवत आहे. सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक पाठबळ देणं  हाच या योजनांचा उद्देश आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसाठी एक अशी योजना आहे की, ज्यामध्ये तुम्ही फक्त 55 रुपये भरायचे आहेत. यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 3000 रुपये पेन्शन म्हणून मिळतील. पीएम किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) असं या योजनेचं नाव आहे. 


पीएम किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्तम अशी योजना आहे. वयाची 60 वर्ष झाल्यानंतर अनेक शेतकरी शेती करण्यास सक्षम राहत नाहीत, त्यामुळं त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं. अशा स्थितीत शेतकऱ्यांना कोणावरही अवलंबून न राहण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही योजना महत्वाची आहे. या योजनेत शेतकऱ्यांना महिना 3000 रुपयांची पेन्शन दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी प्रक्रिया काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 


 55 रुपयापासून 200 रुपयांपर्यंत प्रिमीयम 


केंद्र सरकारनं 2019 मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु केली होती. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मिळावा हाच या योजनेच्या मागचा उद्देश होता. 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यानुसार तुम्हाला या योजनेत प्रिमीयम भरावे लागतात. ज्याची किंमत 55 रुपयापासून 200 रुपयांपर्यंत आहे. त्यानंतर वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला महिना 3000 रुपयांची पेन्शन मिळते. दरम्यान, कोणत्याही कारणाने संबंधीत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला निम्मी पेन्शन म्हणजे 1500 रुपये मिळतात.


कसा घ्या या योजनेचा लाभ?


तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला https://labour.gov.in/pmsym या वेबसाईटवर जावं लागेल. या साईटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती भरावी लागेल. त्यानंतर जनरेट ओटीपी केल्यानंतर तो ओटीरी टाकावा. त्यानंतर अर्ज सबमीट करावा. यानंतर तुमची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. 


महत्वाच्या बातम्या:


फक्त 3000 रुपयांची गुंतवणूक करा, महिना 1.5 लाख रुपये मिळवा; नेमकी काय आहे योजना?